
भारत सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून आर्थिक पाठबळ दिलं जातं. अशीच एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. सरकार महिलांसाठी ही योजना राबवत असून, या योजनेद्वारे त्यांच्या ठेवींवर आकर्षक व्याजदराचा लाभ मिळते. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत महिलांना ७.५ टक्के व्याज मिळत आहे. यात महिला किमान १००० रुपये ते २ लाख रुपये गुंतवू शकतात. २ वर्षांनी आपण गुंतवलेली रक्कम व्याजासह काढू शकता. व्याज दर जास्त असल्यामुळे गुंतवणुकीच्या रकमेसह उत्तम परतावा मिळतोय.
योजनेसाठी कुठे खाते उघडावे लागेल?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ प्रत्येक महिलांना मिळतो. जर आपल्यालाही या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर, आपण आपल्या नावे खाते उघडू शकता. आपण पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकांमध्ये खाते उघडू शकता. जर मुलगी अल्पवयीन असेल तर, मुलीच्या नावाने पालकांना खाते उघडता येईल. जेणेकरून याचा लाभ प्रत्येक मुलगी आणि महिलांना मिळेल.
खाते उघडण्यासाठी आपल्याला खास काही कागदपत्रांची आवश्यकता नाही. खाते उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रंगीत फोटो इत्यादी केवायसी कागदपत्रांची आवश्यकता आहे. या कागदपत्रांच्या आधारावर आपण महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते उघडू शकता. विशेष म्हणजे नियमांनुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पैसे काढण्याची परवानगी मिळते.
अशा परिस्थितीत आपण खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी ४० टक्के रक्कम काढू शकता. म्हणजेच समजा आपण १ लाख रुपये जमा केले असतील तर एक वर्षानंतर आपण ८० हजार रुपये काढू शकता. यासंदर्भात, डेप्युटी पोस्टमास्तर चित्रा जोशी म्हणाल्या, 'महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कारण ही योजना सर्व वयोगटातील महिलांसाठी उपलब्ध आहे. या योजनेत खाते उघडण्यासाठी ३१ मार्च २०२५ ही शेवटची तारीख आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.