Maharashtra Politics: शिंदे गटाच्या नेत्याला धक्का! अपक्ष उमेदवाराकडून कोर्टात धाव, विजयाला दिलं आव्हान

Mahendra Thorve Election Case: रायगडमधील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर सुधाकर घारे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
politics news
politics newsSaam Tv News
Published On

रायगड: रायगडमधील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर सुधाकर घारे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत थोरवे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. थोरवे यांच्या निवडणुकीतील विजयावर आक्षेप घेत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये निसटता विजय मिळवले असल्याचा दावा घारे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे.

कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या आडचणीत वाढ झाली आहे. कारण आमदार थोरवे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच ही याचिका मुंबई हायकोर्टाने स्वीकारली आहे. अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी थोरवे यांच्या निवडणुकीतील विजयावर अक्षेप घेत ही याचिक दाखल करण्यात आली आहे.

politics news
Nagpur News: असला कसला राग? वाढदिवस साजरा करत नसल्यामुळे चिडला, १० वर्षांच्या मुलानं घर सोडलं

शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवडणूक विजयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेतल्यानं, थोरवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या याचिकेत घारे यांनी महेंद्र थोरवे विरोधात विविध आरोप लगावले. तसेच भ्रष्ट पद्धतीने निवडणुकीमध्ये निसटता विजय मिळविला असल्याचा आरोप घारे यांनी केला आहे.

politics news
Delhi Political News: बेरोजगारांना दरमहा ८,५०० रूपये मिळणार..निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तिसरी गॅरंटी जाहीर

खोटा अपप्रचार, भ्रष्टाचार, डमी उमेदवार उभे करून चुकीचे आणि भ्रष्ट पद्धतीने निवडणुकीमध्ये निसटता विजय मिळवला असल्याचं घारे यांचं म्हणणं आहे. याबाबतचे सर्व पुरावे जमा करून अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी हायकोर्टामध्ये थोरवे यांच्या निवडणूक विजयाला आव्हान दिलं आहे. तसेच ही याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारली आहे. त्यामुळे थोरवे यांच्या अडचणीत आणखीन वाढ होणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com