Nagpur News: असला कसला राग? वाढदिवस साजरा करत नसल्यामुळे चिडला, १० वर्षांच्या मुलानं घर सोडलं

Shocking Birthday Story: पाचवीत शिकणाऱ्या मुलानं पालक वाढदिवस साजरा करत नसल्यामुळे रागाच्या भरात घर सोडण्याचा निर्णय घेतला. ही धक्कादायक घटना नागपुरच्या वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
Nagpur News
Nagpur NewsSaam Tv News
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर: सर्वांच्या आयुष्यात वाढदिवस म्हणजे महत्त्वाचा दिवस. या दिवशी आपल्या स्पेशल फिल होतं. कारण प्रत्येक जण आपल्याला स्पेशल ट्रिटमेंट देतात. गिफ्ट्स, सरप्राईज आणि विविध गोष्टींमुळे आपल्याला हा दिवस संपू नये असं वाटतं. पण जस जसं वय वाढत जातं, तस तसं आपण वाढदिवस साजरा करणे बंद करतो. पण अनेकांचा यामुळे हिरमोड होतो. याच कारणामुळे एका मुलानं रागाच्या भरात आपलं घर सोडलं आहे.

ऐकूण आश्चर्य वाटलं ना? पण हो, पाचवीत शिकणाऱ्या मुलानं पालक वाढदिवस साजरा करत नसल्यामुळे रागाच्या भरात घर सोडण्याचा निर्णय घेतला. हा असला कसला राग? हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. ही धक्कादायक घटना नागपुरच्या वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. पालक वाढदिवस साजरा करीत नाहीत, म्हणून चिमुकल्यानं वेगळंच पाऊल उचललं आहे.

Nagpur News
Delhi Political News: बेरोजगारांना दरमहा ८,५०० रूपये मिळणार..निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तिसरी गॅरंटी जाहीर

वाढदिवस साजरा करीत नसल्यामुळे पाचवीत शिकणाऱ्या मुलानं घरातून पळ काढला. रागाच्या भरात मुलगा निघून गेल्यामुळे तो कुठे आणि का गेला? याचा थांगपत्ता कुणालाच नव्हता. मुलाच्या आई वडीलांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, शोध घेऊनही मुलगा सापड नव्हता. मुलगा सापडत नसल्यामुळे आई वडिलांनी याची माहिती पोलिसांना दिली.

Nagpur News
Mumbai Nashik Highway: कसारा घाटात बसचा थरारक अपघात, मिनी बस ३ वेळा पलटली; २१ जण गंभीर जखमी

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मुलाच्या शोधाला सुरूवात केली. यावेळी गस्तीवर असणाऱ्या पथकाला मुलगा परिसरातील स्वामी नारायण मंदिरात सापडला. पोलिसांनी तातडीने मुलाला पालकांच्या ताब्यात दिलं. यावेळी मुलाला पालकांच्या स्वाधिन केल्यानंतर, पोलीस निरीक्षक हरीशकुमार बोराडे आणि कर्मचार्‍यांनी केक कापून मुलाचा वाढदिवस साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com