NTPC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; NTPC मध्ये ४०० रिक्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

NTPC Recruitment 2025: एनटीपीसीमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
NTPC Recruitment
NTPC RecruitmentSaam Tv
Published On

सरकारी नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एनटीपीसीमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०२५ आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती ntpc.co.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

NTPC Recruitment
Income Tax Job: आयकर विभागात नोकरीची संधी; पगार २ लाख रुपये; पात्रता काय? जाणून घ्या

एनटीपीसीमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ४०० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. एनटीपीसीमध्ये याआधी इंजिनियरिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी ४७५ रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख उद्या आहे. दरम्यान, त्यानंतर लगेचच एनटीपीसीमध्ये नोकरी भरती जाहीर करण्यात आली आहे.(NTPC Recruitment)

NTPC Recruitment
Job News: अ‍ॅग्रीकल्चर विमा कंपनीमध्ये व्यवस्थापकीय पदांची भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची तारीख

एनटीपीसीमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयात इंजिनियरिंग डिग्री प्राप्त केलेली असावी. याशिवाय उमेदवाराकडे गेट परीक्षेचे सर्टिफिकेट असायला हवे. या नोकरीसाठी तुम्ही उद्यापर्यंत अर्ज करु शकतात. एनटीपीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपासून ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.

NTPC Recruitment
Central Bank Jobs: सेंट्रल बँकेत अधिकारी होण्याची संधी; पगार ८५९२०; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

आयकर विभागात भरती

सध्या आयकर विभागात भरती सुरु आहे. आयकर विभागात २८ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. असिस्टंट डायरेक्टर, अॅडिशनल डायरेक्ट अशा अनेक पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही incometaxindia.gov.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

NTPC Recruitment
Indian Oil Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार इंडियन ऑइलमध्ये नोकरी; २०० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com