Income Tax Raid Satara: रामराजे नाईक निंबाळकर यांच्या चुलत भावांच्या घरी आयकर विभागाचा छापा

Income Tax Investigation Nimbalkar Family: माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकलाय.
Satara Income Tax raid
Satara Income Tax raidSaam Tv News
Published On

सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकलाय. आयकर विभागाचे पथक संजीवराजे निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले असून, इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू आहे.

संजीवराजे नाईक यांच्यासह रघुनाथ नाईक निंबाळकर यांच्या घरावरही केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. हे दोघेही रामराजे यांचे चुलत बंधू आहेत . सकाळी त्यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी छापा टाकण्यासाठी दाखल झाले असून, बंगल्यामध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या विषयाचं कारण अद्याप अस्पष्ट असून, राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.

Satara Income Tax raid
Veer Pahariya: मी ट्रोलिंगला नेहमीच हलक्यात.. सोलापूरात प्रणित मोरेवर हल्ला, वीर पहारियानं दिली पहिली प्रतिक्रिया

रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे आधीपासून शरद पवार यांच्या पक्षात आहेत. तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. संजीवराजे हे येत्या काही दिवसांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, घरवापसी करण्यापूर्वीच त्यांच्या बंगल्यावर आयकर विभागानं छापा टाकला आहे.

Satara Income Tax raid
Nandurbar News: रस्त्याची दुरावस्था, घरीच करावी लागली महिलेची प्रसूती, बाळाचा मृत्यू; नंदुरबारमधील भीषण वास्तव

रघुनाथराजे नाईक निंबाळकरांची प्रतिक्रिया

'संजीवराजे निंबाळकर आणि माझ्या घरावर आयकर विभागा छापा टाकणार असल्याची माहिती मिळाली. मी पुण्यात होतो आता फलटणमध्ये आहे. आम्ही राजघराण्यातून येतो. त्यामुळे आमच्याकडे काही वेडंवाकडं सापडेल, असं वाटत नाही', अशी प्रतिक्रिया रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com