
सागर निकवाडे, साम टीव्ही
गावाला रस्ता नसल्यानं एका आदिवासी महिलेची प्रसूती घरातच झाली आहे. घरातच प्रसूती झाल्यानं नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. यात प्रसूती झालेल्या महिलेच तब्येत नाजूक असून, प्रसूती झाल्यानंतर तिला रूग्णालयात गाठण्यासाठी बांबू झोळीतून जंगल मार्गाने जीवघेणा प्रवास करावा लागला आहे. ही धक्कादायक घटना नंदुरबारच्या केलापानी गावात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लीला वसावे असे प्रसूती झालेल्या महिलेचं नाव आहे. ३ फेब्रुवारीला तिला प्रसूती कळा जाणवू लागल्या होत्या. मात्र, वेळ रात्रीची होती आणि रूग्णालय गाठणं अशक्य होतं. याला कारण आहे खराब रस्ता. खराब रस्त्यामुळे गावात रूग्णवाहिका वेळेत पोहोचणं कठीण होतं. महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यामुळे तिच्या घरी काही गावातील महिला मदतीला आल्या.
गावातील आदिवासी महिलांनी तिची प्रसूती केली. रूग्णवाहिका नसल्यामुळं नंतर आदिवासी बांधवांनी बांबूपासून झोळी तयार केली आणि जंगल मार्गानं महिलेला मुख्य रस्त्यापर्यंत नेलं. १५ किलोमीटरते अंतर पार करण्यासाठी ५ तासांचा वेळ गेला. मुख्य रस्त्यावर रूग्णवाहिका आली. नंतर आदिवासी महिलेला तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल करण्यात आले. आदिवासी महिलेची प्रकृती स्थिर आहे, मात्र तिचे नवजात बाळ दगावले.
केलापानी गाव आणि पाटीलपाडा या गावात २५ जानेवारी २०२४ ला रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, वर्ष उलटूनही रस्त्याच्या कामाला सुरूवात झालेली नाहीये. या दोन गावातील अंतर हे साधारण १५ किलोमीटर आहे. तरी देखील फक्त ५ किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. पण मंजूर करण्यात आलेल्या रस्त्याचं देखील काम अद्याप सुरू केलेलं नाही. ज्याचा फटका गावातील आदिवासी बांधवाना बसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.