Fuel Ban Saam Tv
बिझनेस

Fuel Ban: ६२ लाख वाहनांना पेट्रोल- डिझेल मिळणार नाही, का आणि कुठे घेण्यात आला निर्णय?

Petrol Diesel Ban For These Vehicles: आता जास्त जुन्या वाहनांना पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाहीये. वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhi Hande

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पेट्रोलच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. दिल्लीमध्ये १ जुलैपासून पेट्रोल पंपावर बदल होणार आहे. आता १० वर्षांपेक्षा जून्या वाहनांना डिझेल आणि १५ वर्षांपेक्षा जास्त जून्या वाहनांन पेट्रोल मिळणार नाहीये. त्यामुळे या वाहनांना आजपासून पेट्रोल-डिझेल दोन्ही मिळणार नाहीये. जवळपास या वाहनांची संख्या ६२ लाख आहे. त्यामुळे ६२ वाहनांना आता इंधन मिळणार नाहीये.

वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोग (CAQM)च्या आदेशानंतर हा नियम लागू करण्यात आला आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

नियम का लागू केला? (Petrol Pump New Rule)

दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या वाहनांची निर्धारित वय पूर्ण झाली आहेत. त्यांना आता पेट्रोल डिझेल मिळणार नाहीये. त्यामुळे रस्त्यावर आता १० ते १५ वर्षे जूनी वाहने धावणार नाहीयेत. या वाहनांमुळे येणाऱ्या धुरामुळे खूप वायू प्रदुषण होत होते. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.

पेट्रोल पंपावर कडक नजर

या नियमांची अंबलबजावणी केली जाणार आहे. यासाठी दिल्ली सरकारची पेट्रोल पंपावर कडक नजर असणार आहे. यासाठी दिल्ली सरकारचा वाहतूक विभाग, दिल्ली पोलिस, वाहतून पोलिक आणि महानगरपालिका एकत्रितपणे काम करतील.याअंतर्गत पेट्रोल पंपावर अधिकारी तैनात केले जातील आणि जुन्या वाहनांवर लक्ष ठेवले जातील.

जुन्या वाहनांना अडचणी

जर एखादे वाहन १० किंवा १५ वर्षे जूने असेल तर त्यांना इंधन मिळणार नाहीये. या परिस्थितीत त्यांना नवीन वाहन खरेदी करावे लागेल किंवा जुने वाहन स्क्रॅप करावे लागेल. सरकारचा असा विश्वास आहे की, या निर्णयामुळे दिल्लीतील वायूपदुषण कमी होईल. नागरिकांना या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी महानगरपालिका निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT