
Burning Train Video: रेल्वे ही भारतातीलच नाही तर प्रत्येक देशातील सामान्य नागरिकांची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र, नुकतीच एक घटना समोर आली आहे, जी संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ठरली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एका ट्रेनमध्ये एका व्यक्तीने चढून आधी पेट्रोल ओतले आणि नंतर आग लावली. या घटनेचा थरकापजनक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आले आहेत.
ही धक्कादायक घटना साउथ कोरियामधील असल्याचे समजत असून एका प्रमुख रेल्वे(Railway) स्थानकादरम्यान घडली आहे. संध्याकाळच्या सुमारास प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमध्ये एक अज्ञात व्यक्ती शिरला. त्याने अचानकच आपल्या पिशवीतून बाटली काढली आणि काहीतरी द्रव ट्रेनच्या आत ओतायला सुरुवात केली. काही सेकंदांमध्येच त्या द्रवाला आग लागली आणि संपूर्ण डब्याला आग लागली. काही प्रवाशांनी ओरडायला सुरुवात केली.
ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांची एकच धावपळ उडाली. वृद्ध, महिला आणि लहान मुलांनी मदतीसाठी आक्रोश केला. काहींना सुटका करता आली, मात्र काहीजण आगीत अडकले. अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचायला थोडा वेळ लागला, पण त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यामध्ये किती जण जखमी झाले याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही, मात्र काही जण गंभीर जळाल्याची माहिती आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) झाला असून, प्रत्येक नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बऱ्याच रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ''ट्रेनमध्ये कोणीही सहजपणे पेट्रोल घेऊन चढतो म्हणजे सुरक्षा कुठे आहे?" असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
टीप: ट्रेनमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.