
Shocking Video: आई म्हणजे माया, प्रेम, त्याग आणि सुरक्षिततेचं दुसरं नाव कायमच असतं. पण जेव्हा हीच आई राक्षसी रूप धारण करते तेव्हा मानवतेला काळिमा फासला जातो. सध्या असाच एक हादरवून टाकणारा प्रकार समोर आला आहे, जिथे एका आईने आपल्या पोटच्या लेकीला थेट चौथ्या मजल्यावरून खाली फेकलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि तो पाहून कोणीही सुन्न होईल.
ही धक्कादायक (Shocking) घटना नेमकी कुठली आहे ते अद्याप समजले नाही. पण एका निवासी इमारतीत घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आई आणि मुलगी या दोघी घरात एकट्याच होत्या. काही वेळानंतर अचानक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून एका लहान मुलीला खाली फेकण्यात आलं. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी झालेल्या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिलेने एका लहान मुलीला उचलून बाल्कनीच्या कठड्यावर नेलं आणि क्षणाचाही विचार न करता तिला खाली फेकून दिलं. आवाज ऐकून खाली असलेले शेजारी धावत आले. या व्हिडिओवर अनेक लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ही घटना समोर आल्यानंतर समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली,"खरचं आई असं कसं करू शकते?'' तर दुसऱ्या यूजरमे म्हटलं,''आईपणाची मर्यादा कुठे गेली?" असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकांनी तर अशा प्रकारच्या घटनेत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे
टीप: सध्या समोर आलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.