Vehicle Price Hike: मोठी बातमी! १ जुलैपासून वाहनांच्या किंमती वाढणार; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

Vehicle Price Hike From 1st July: उद्यापासून वाहनांच्या किंमतीत वाढ होणार आहे. ३० लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या वाहनांवर ६ टक्के कर लागणार आहे.
Vehicle Price Hike
Vehicle Price HikeSaam Tv
Published On

प्रत्येकाची आपली स्वतः ची कार असावी, असे स्वप्न असते. त्यामुळे अनेकजण कार खरेदी करतात. काही जणांना लक्झरी कार खूप आवडतात. त्यामुळे ते महागड्या कार घेतात. जर तुम्हीही कार खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. आता उद्यापासून वाहनांच्या किंमतीत वाढ होणार आहे.

Vehicle Price Hike
EPFO च्या सर्व्हिसमध्ये मोठा बदल; कसा कराल पीएफचं ट्रान्सफर अन् बॅलन्स चेक?

३० लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या कार महागणार

३० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विद्युत वाहनांना आणि पेट्रोल डिझेलवरील वाहनांच्या किंमती वाढणार आहेत.राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेण्यात आला होता. १ जुलैपासून ३० लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या विद्युत वाहनांवर ६ टक्के कर आकारला जाणार आहे.

सीएनजी-एलपीजी, पेट्रोल डिझेलवरील वाहनांवरील कर १ टक्क्याचे वाढवण्यात येणार आहे. याबाबत परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी माहिती दिली आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवरील वाहनांची संख्या वाढली होती. विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यावर ६ टक्के सवलत देण्यात आली होती. त्यानंतर आता ही सवलत पुन्हा मागे घेण्यात आली आहे.

महसुलवाढीच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता सीएनजी आणि एलपीजी वाहने खरेदी करताना अतिरिक्त १ टक्के कर आकारला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला आहे. १ जुलैपासून म्हणजेच उद्यापासून हा निर्णय लागू होणार आहे.

Vehicle Price Hike
Monsoon Car Service: पावसाळ्यापूर्वी ‘ही’ वाहन तपासणी करून घ्या अन् अपघात टाळा!

सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनातच हा निर्णय घेतला होता. त्यानंतर याची अंबलबजावणी उद्यापासून होणार आहे. परंतु यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. जर तुम्ही ३० लाखांपेक्षा जास्त किंमतीची कार घेत असाल तर तुम्हाला ६ टक्के कर भरावा लागणार आहे. जो याआधी आकारला जात नव्हता.

Vehicle Price Hike
Car Romance: महामार्गावर कपलचा खुल्लमखुल्ला रोमान्स, कारच्या सनरूफवर उभं राहून लिपलॉक; VIDEO तुफान व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com