Indian Railways: रेल्वेचा क्रांतीकारी बदल; आरक्षण चार्टबाबत घेतला महत्वाचा निर्णय, प्रवाशांची सुविधा वाढणार, वाचा सविस्तर

Indian Railways Revamps Ticketing System: भारतीय रेल्वेची नवीन आरक्षण प्रणाली 8 तास आधी चार्ट तयार करणार आहे. त्याचबरोबर तत्काळ तिकिटांसाठी OTP आधारित प्रमाणीकरण करणार आहे.
Central Railway
Central RailwaySaam Tv
Published On

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. रेल्वने तिकीट आरक्षण प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. तिकीट प्रणाली स्मार्ट, पारदर्शक, प्रवासी-केंद्रित आणि कार्यक्षम असावी यासाठी रेल्वेकडून भर दिला जाणार आहे.भारतीय रेल्वेने प्रस्तावित असलेल्या नव्या सुधारणांबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

Central Railway
Raj Thackeray : समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतु...; राज ठाकरेंचा पुन्हा फडणवीस सरकारला इशारा

रेल्वेचे आरक्षण चार्ट हे ट्रेन सुटण्याआधी ४ तास आधी तयार केले जाते. मात्र, यामुळे प्रवाशांच्या मनात अनिश्चितता निर्माण व्हायची. तसेच अनेक जण वेटलिस्ट तिकिटांवर अवलंबून असतात. त्यामुळे अशा प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वे मंडळाने चार्ट ट्रेन सुटण्याआधी ८ तास आधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडलाय. त्याला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे.

Central Railway
Share Market : जोरदार! रिलायन्सच्या गुंतवणूकदारांनी अवघ्या ५ दिवसांत कमावले 70,000,00,00,000 रुपये

ही प्रक्रिया आता टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. रेल्वेच्या क्रांतीकारी बदलामुळे वेटलिस्ट प्रवाशांना त्यांच्या तिकिटाच्या स्थितीची माहिती लवकर मिळणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाने दूरच्या भागातून राहणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. तसेच तिकिट- कन्फर्म न झाल्यास पर्यायी व्यवस्थेसाठी अधिक वेळ मिळणार आहे.

Central Railway
Beed : धक्कादायक! बीडमध्ये वारकऱ्याला मारहाण; वृद्ध व्यक्ती हताश होऊन पोलिस ठाण्यात गेला, पण...

तसेच रेल्वेकडून नवीन पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम डिसेंबर २०२५ पासून कार्यान्वित होणार आहे. रेल्वेची ही प्रणाली सध्याच्या तुलनेत दहापट कार्यक्षम असणार आहे. तर पीआरएसमध्येही प्रति मिनिट 1.5 लाख तिकिटे बुक करण्याची क्षमता तयार होणार आहे. ही प्रणाली सध्याच्या 32,000 तिकिटांपेक्षा पाचपट अधिक असणार आहे. तिकीट चौकशी क्षमता देखील 4 लाखांवरून 40 लाख प्रति मिनिट इतकी वाढणार आहे.

प्रवाशांना पसंतीच्या सीटची देखील निवड करता येणार आहे. दिव्यांग, विद्यार्थी, रुग्णांसाठी विशेष सुविधा उपलब्ध होणार आहेत. रेल्वेची नवी प्रणाली प्रवाशांच्या गरजेनुसार तयार करण्यात आली आहे. यामुळे तिकीट बुकिंग सुविधा अधिक सुलभ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com