Beed : धक्कादायक! बीडमध्ये वारकऱ्याला मारहाण; वृद्ध व्यक्ती हताश होऊन पोलिस ठाण्यात गेला, पण...

Beed News : बीडमध्ये वारकऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली. वृद्ध वारकरी हताश होऊन पोलिस ठाण्यात गेला, पण तिथेही तक्रार नोंदवण्यात टाळाटाळ केली.
Beed News update
beed News Saam tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडमध्ये निष्पाप व्यक्तींना मारहाणीच्या घटना सुरुच आहेत. बीडमध्ये आता जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या दिंडीतील वारकऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. दिंडीतील ७५ वर्षीय वयोवृद्धाला ही मारहाण झाली. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे. आश्रुबा किसन सोनवणे असे मारहाण झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. या वारकऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध बीडकरांकडून केला जात आहे.

Beed News update
Uddhav Thackeray : हिंदी सक्तीचे जीआर रद्द, आता ५ जुलैला मोर्चा होणार का? उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

मिळालेल्या माहितीनुसार, दिंडीत चालत असताना चक्कर येत असल्याने आणि धाप लागत असल्याने उपचार घेण्यासाठी ७५ वर्षीय आश्रुबा किसन सोनवणे हे वारकरी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना रात्री काही उपचार देण्यात आले. मात्र सकाळी रुग्णालयातील वैभव लोहाट नामक कर्मचाऱ्याने या वारकऱ्याला मारहाण केली. तसेच रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचे वारकऱ्याने सांगितलं. मारहाणीनंतर हताश झालेला वयोवृद्ध वारकरी यानंतर डिस्चार्ज घेऊन रुग्णालयातून बाहेर पडला.

Beed News update
Devendra Fadnavis : विरोधकांच्या मराठीतील पत्रात व्याकरणाच्या २४ चुका; हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल

मारहाणीनंतर वृद्ध वारकरी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला. मात्र तिथे पोलिसांनी आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगून तक्रार घेण्यास नकार दिला. मात्र ही बाब अतिशय गंभीर असून यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांच्या काळात जिल्हा रुग्णालयात अनेक चुकीचे प्रकार घडत असल्याने लोकांमध्ये संताप जाणवत आहे.

Beed News update
Akola Shocking : अकोला हादरलं! समलिंगी बँक अधिकाऱ्यावर चौघांकडून अत्याचार; व्हिडिओ बनवून ८० हजार उकळले

फोनवरून बोलताना मला याबाबत काहीही माहिती नाही मी बाहेर कार्यक्रमात आहे‌. माहिती घेऊन सांगतो, असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी सांगितलं आहे. यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान बीड शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com