Akola Shocking : अकोला हादरलं! समलिंगी बँक अधिकाऱ्यावर चौघांकडून अत्याचार; व्हिडिओ बनवून ८० हजार उकळले

Akola crime news : अकोल्यात बँक अधिकाऱ्यावर चौघांकडून अत्याचार झाल्याची घटना घडली. या अधिकाऱ्याचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडून ८० हजार उकळण्यात आले आहेत.
akola News
akola Saam tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

Akola Crime : अकोल्यात 'गे-डेटिंग' अँप'द्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. आजकाल 'गे-डेटिंग' अॅप्स समलिंगी पुरुषांसाठी फसवणुकीचा मोठा अड्डा बनलाय. या ॲपच्या माध्यमातून काही गुन्हेगार ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकवत आहे. अकोल्यात देखील 'गे-डेटिंग' ॲपच्या माध्यमातून बँकेच्या एका अधिकाऱ्यासोबत या अॅपवर ओळख करीत, त्यानंतर या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी अज्ञात स्थळी बोलवलं. त्यानंतर तिथे चौघांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केलाय. इतकंच नव्हे तर या संपूर्ण घटनेचं मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केले. पुढं बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करीत तब्बल 80 हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक केले. चौघांपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. मनीष नाईक आणि मयूर बागडे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

akola News
Ladki Bahin Yojana : लाखो लाडकींचा हफ्ता बंद होणार? अपात्र लाडकींच्या शोधासाठी ITशी करार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नेमकं काय घडलं?

अकोल्यातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत एका पीडित बँकेच्या अधिकाऱ्याने समलिंगी अर्थातच 'गे-डेटिंग' अ‍ॅपवरुन फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. अधिकाऱ्यने तक्रारीत म्हटलं आहे की समलिंगी डेटिंग अ‍ॅपवरुन एका व्यक्तीने संपर्क साधला. पुढं मैत्री झाली अन् बोलणं सुरु झालं. 14 जून रोजी भेटायचं ठरलं. त्यानंतर अकोल्यातीलच हिंगणा फाट्याजवळ बँकेचा अधिकारी त्या व्यक्तीला भेटायला गेला. तिथे मनीष नाईक हा भेटायला पोचला. त्यानंतर तिथून दोघेजण कारने शहरातल्या नदीच्या काठी गेले.

या ठिकाणी त्याने बँकेच्या अधिकाऱ्यासोबत समलिंगी संबंध प्रस्थापित केलेत. त्यानंतर त्याने त्याच्या 3 साथीदाराना देखील बोलावून घेतलं. त्यांनी देखील या अधिकाऱ्यावर अत्याचार केलाय. या दरम्यान, पीडिताचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि त्यावरुन ब्लॅकमेल करत माझ्याकडून पहिल्या टप्प्यात 30 हजार रुपयांपेक्षा अधिक रुपये उकळले. त्यानंतर काही दिवसातच पुन्हा पैसे घेतले. असे एकत्रित आतापर्यंत 79 हजार 300 रुपये उकळले आहे, अशी माहिती पीडित व्यक्तीने पोलिसांना दिली.

akola News
Shefali Jariwala Death : 'काटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाने घेतला जगाचा निरोप; अकाली मृत्यूमागचं गूढ काय? पाहा व्हिडिओ

खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीला पकडण्यासाठी विशेष सापळा रचण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांकडं केवळ आरोपीचा मोबाईल क्रमांक होता. मात्र ठोस पुरावे हाती नव्हते. म्हणून पीडित आरोपीच्या शोधांसाठी पीडित व्यक्ती पुन्हा तरुणांसोबत भेटण्यासाठी गेला. त्यावेळी मनीष नाईक हा तिथे आला. लागलीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अशा प्रकारे संपूर्ण घटनेचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेत दोन आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

akola News
Mumbai Shocking : अस्थी विसर्जनासाठी गेले,पुन्हा परतलेच नाही; हाजीअलीजवळील समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

आरोपी पीडितांना इंजेक्शन द्यायचे, अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष नाईक याच्याकडे इंजेक्शन होते. हा भेटण्यासाठी आलेल्या पिडीतांना अर्थातच गे-पुरुषांना इंजेक्शन द्यायचा, जेणेकरून त्यांच्यामध्ये उत्तेजना निर्माण व्हायची. त्यानंतर हे पीडितांवर अत्याचार करायचे. दरम्यान आतापर्यंत या चौघांनी गे-डेटिंग ॲपच्या माध्यमातून कित्येकांची फसवणूक केली, याचा तपास देखील पोलीस करणार आहेत. दरम्यान, संपूर्ण घटनेनंतर फसवणूक झालेल्या पीडितांनी समोर येण्याच आवाहन पोलिसांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com