Share Market : जोरदार! रिलायन्सच्या गुंतवणूकदारांनी अवघ्या ५ दिवसांत कमावले 70,000,00,00,000 रुपये

Big Earning Of Reliance Investors : रिलायन्सचे गुंतवणूकदार अवघ्या ५ दिवसांत मालमाल झाले आहेत. या गुंतवणूकदारांनी ५ दिवसांत कमावले 70,000,00,00,000 रुपये कमावले आहेत.
Share Market News
Share Market saam tv
Published On

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मागील आठवडा गेम चेंजर ठरला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ३० शेअर्स असलेल्या सेन्सेक्सच्या टॉप १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांच्या ९ बाजारमुल्यात मोठी वाढ झाली आहे. रिलायन्सच्या गुंतवणूदारांनाही मागील पाच दिवसांत मोठा फायदा झाला आहे. त्यांनी मागील ५ दिवसांत ७०००० कोटी रुपयांची कमाई केली आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीशिवाय भारती एयरटेल आणि एचडीएफसी बँकेत गुंतवणूक करणाऱ्यांनाही मोठा फायदा झाला आहे.

मागील आठवड्यात शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली. टॉप १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांचं मार्केट कॅप एकूण २.३४ लाख कोटी रुपयांनी वाढलं. यादरम्यान बीएसई सेन्सेक्स आठवडाभरात १,६५०.७३ अंकांनी म्हणजे २ टक्क्यांनी वाढला. कमाई करणाऱ्या टॉप ३ कंपन्यांमध्ये रिलायन्स, भारती एयरटेल आणि एचडीएफसी बँकेचा समावेश आहे. या व्यतिरिक्त बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, टीसीएस, एलआयसी आणि एचयूएल या कंपन्यांनाही फायदा झाला आहे. तर इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांचं नुकसान झालं आहे.

रिलायन्स इंड्रस्टीचं मार्केट कॅपिटलयाजेशन मागील आठवड्यातील ५ दिवसांत 20,51,590.51 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. मागील ५ दिवसांत कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 69,556.91 रुपयांची कमाई केली. कमाईच्या बाबतीत भारती एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली.

Share Market News
Mumbai Shocking : अस्थी विसर्जनासाठी गेले,पुन्हा परतलेच नाही; हाजीअलीजवळील समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

भारती एअरटेलचं मार्केट कॅप 51,860.65 कोटी रुपयांहून 11,56,329.94 कोटी रुपयांवर पोहोचलं. एचडीएफसी बँकेचं मार्केट कॅप 37,342.73 कोटी रुपयांहून 15,44,624.52 कोटी रुपयांवर पोहोचलं. रिलायन्स, भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँकेच्या मार्केट कॅपमध्येही उसळी पाहायला मिळाली.

Share Market News
Akola Shocking : अकोला हादरलं! समलिंगी बँक अधिकाऱ्यावर चौघांकडून अत्याचार; व्हिडिओ बनवून ८० हजार उकळले

इन्फोन्सिसच्या गुंतवणूदारांना फटका

टॉप-१० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांना जोरदार फायदा झाला. आयटी कंपनी इन्फोन्सिसच्या मार्केट कॅपिटलायजेशनमध्ये घट पाहायला मिळाली. मागील ५ व्यवहाराच्या दिवसांत बाजारमूल्यांमध्ये 5,494.8 कोटी रुपयांनी घट झाली. त्यामुळे कंपनीचं मार्केट कॅप 6,68,256.29 कोटी रुपयांवर पोहोचलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com