CNG PNG : मुंबईकरांना तिसरा धक्का; सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढले | VIDEO

CNG PNG latest rates : महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीचे दर प्रतिकिलो ₹१.५० आणि पीएनजीचे दर ₹१ ने वाढवले. ही दरवाढ ८ एप्रिल २०२५ पासून लागू, घरगुती बजेटवर परिणाम होणार.

Rates Of CNG And PNG Increased : पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीनंतर मुंबईकरांना आणखी एक महागाईचा झटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) च्या दरात वाढ केली. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 1.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजीचे दर 79.50 रुपये प्रतिकिलो इतका आहे. त्याचप्रमाणे, पीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 1 रुपयाची वाढ झाली आहे. ही दरवाढ मंगळवारी (8 एप्रिल 2025) मध्यरात्रीपासून लागू झाली आहे.

महानगर गॅस लिमिटेडने सांगितले की, देशांतर्गत गॅस पुरवठ्यात कमतरता आणि सीएनजी व पीएनजीच्या वाढत्या मागणीमुळे आयात केलेल्या महागड्या नैसर्गिक वायूचा (LNG) वापर करावा लागत आहे. यामुळे खर्च वाढला असून, त्याचा काही भाग ग्राहकांवर टाकणे आवश्यक झाले आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे ऑटो आणि टॅक्सी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, घरगुती खर्च वाढल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांना आपले बजेट पुन्हा आखावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com