Healthy Fruit: पेर की सफरचंद कोणतं फळ आहे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर?

Shruti Vilas Kadam

फायबरचे प्रमाण

पेरमध्ये सफरचंदापेक्षा थोडे जास्त फायबर असते. त्यामुळे पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेसाठी पेर अधिक उपयुक्त ठरू शकते.

apples | saam tv

हृदयाच्या आरोग्यासाठी

दोन्ही फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लॅव्होनॉइड्स असतात. मात्र सफरचंदातील क्वेरसेटिन हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

Pears | canva

वजन कमी करण्यासाठी

पेर आणि सफरचंद दोन्ही लो-कॅलरी फळे आहेत. जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यासाठी पेरमधील फायबर फायदेशीर ठरते.

Apple | yandex

मधुमेह नियंत्रण

दोन्ही फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. मात्र सालीसह खाल्ल्यास दोन्ही फळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

Pear

त्वचेसाठी फायदे

सफरचंदातील व्हिटॅमिन C त्वचेला ग्लो देते, तर पेरमधील पाणी आणि फायबर शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करतात.

Apple With Black Salt | GOOGLE

रोगप्रतिकारक शक्ती

दोन्ही फळे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत. नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

पचायला सोपे कोणते?

पेर हे अधिक रसाळ आणि मऊ असल्याने काही लोकांसाठी पचायला सोपे वाटते. सफरचंद थोडे कडक असल्याने चावून खावे लागते.

Apple Face Pack | GOOGLE

Daily wear Simple Mangalsutra Design: साडी ते ड्रेससाठी परफेक्ट, रोजच्या वापरासाठी ट्राय करा 'हे' ट्रेंडी मंगळसूत्र

Daily wear Simple Mangalsutra Design | Saam Tv
येथे क्लिक करा