Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: मुलाच्या शिक्षणासाठी घर विकले, आईने दागिने गहाण ठेवले; २३ व्या वर्षी एकदा नव्हे तर दोनदा क्रॅक केली UPSC; प्रदीप सिंह यांचा प्रवास

Success Story Of IAS Pradeep Singh: आयएएस प्रदीप सिंह यांनी २३ व्या वर्षी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांच्या शिक्षणासाठी आईवडिलांनी घरदेखील विकले होते.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु यूपीएससी परीक्षा क्रॅक करणं हे सोपं नसतं. अनेकदा परीक्षा दिल्यावर अपयश येतं. परंतु प्रदीप सिंह यांनी २३ व्या वर्षी एकदा नाही तर दोनदा यूपीएससी क्रॅक केली आहे. (Success Story Of IAS Pradeep Singh)

प्रदीप सिंह हे मूळचे बिहारच्या गोपालगंड येथील रहिवासी. त्यांचा आयएएस होण्याचा प्रवास हा खूप कठीण होता. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी त्यांच्या आई-वडिलांना घरदेखील विकावे लागले. तर त्यांच्या आईने दागिने गहाण ठेवले. (UPSC Success Story)

प्रदीप यांच्या वडिलांचे स्वप्न होते की, माझ्या मुलाने खूप मोठं व्हावं. त्याने काहीतरी करावं. यासाठी त्यांचे वडिल पेट्रोल पंपावर काम करायचे. परंतु त्यांच्या कमाईतून प्रदीप यांच्या यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी लागणारा खर्च भागत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपले घर विकले.त्यानंतर आपल्या आईचे दागिनेदेखील गहाण ठेवले. त्यांनी आपल्या मुलाला यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला पाठवले.

प्रदीप यांनी आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली. त्यांनी २०१८ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी ९३ रँक मिळवली. तेव्हा त्यांची नियुक्ती इंडियन रेवेन्यू सर्विसमध्ये (IRS) झाली.प्रदीप यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. त्यात त्यांना यश मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhar Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

Ind vs Eng Test : इंग्लंडचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; मँचेस्टर कसोटीच्या २ दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा, जादुई खेळाडूची ८ वर्षांनी एन्ट्री

SCROLL FOR NEXT