RBI Repo Rate Saam Tv
बिझनेस

RBI Repo Rate: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार; पुढच्या महिन्यात गुड न्यूज मिळणार!

RBI Repo Rate May Decrease In April: एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. एप्रिल महिन्यात रेपो रेटमध्ये कदाचित कपात होऊ शकते.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. रिझर्व्ह बँक पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये (RBI Repo Rate) कपात करण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या पुढच्या महिन्यात होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

याबाबत इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च या एजन्सीने सांगितले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलनविषयक धोरण समिती (RBI Monetary Policy) पुढच्या महिन्यात बैठक घेणार आहे. या बैठकीत आर्थिक वाढीला गती देण्याच्या उद्देशाने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात करु शकते.

याबाबत इंडिया रेटिंग्सचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ देवेंद्र कुमार यांनी सांगितले की, आम्हाला नवीन आर्थिक वर्षात मुख्य चलनवाढ ही ४.७ टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात चलनवाढीत ०.७५ टक्क्यांपर्यंत कपात होऊ शकते. जर अमेरिकेच्या शुल्काचा परिणाम जास्त प्रमाणात झाला तर आरबीआय चलनविषयक धोरणात बदल करु शकतो , असं त्यांनी म्हटलं आहे. पुढच्या आर्थिक वर्षात आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या ६ बैठका होती. यातील पहिली बैठक ही ७ ते ९ एप्रिल या कालावधीत होणार आहे. यामध्येच रेपो रेटसंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.याबाबत लाईव्ह हिंदुस्ताननने वृत्त दिले आहे.

रेटिंग रिसर्च एजन्सीमध्ये माहिती दिली आहे की, 'चलनविषयक धोरण समिती एप्रिल महिन्यात होणार्‍या बैठकीत रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात करु शकते'. त्यामुळे सर्वसामान्यांना फायदा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उच्च चलनवाढीमुळे आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नव्हता.

फेब्रुवारीमध्ये रेपो रेटमध्ये केली होती कपात

फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला होता. रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी कमी केला होता. दरम्यान, हा रेपो रेट अजून कमी होण्याची शक्यता आहे.यामध्ये किरकोळ महागाई चार टक्क्यांनी कमी होईल. २०२५-२६ मध्ये आरबीआय तीनदा रेपो रेटमध्ये कपात करेल, अशी अपेक्षा आहे. यामुळे रेपो रेट दर ५.५ टक्के होऊ शकतो. येत्या आर्थिक वर्षात १ टक्क्यांनी रेटमध्ये कपात होऊ शकते. यामुळे महागाईदेखील कमी होईल. याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीनंतरच देण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

Best Indian Patriotic Movies: या विकेंडला बघा देशभक्ती जागवणारे हे ७ चित्रपट

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

SCROLL FOR NEXT