मधुचंद्राच्या रात्री रोमान्स करत होतं नवविवाहित जोडपं, चुकून व्हिडिओ झाला लाइव्ह, सोशल मीडियावर व्हायरल

Newlywed Couple Honeymoon Video Accidentally Went Live: नवविवाहित जोडप्याचा मधुचंद्रातील खासगी क्षण चुकून सोशल मीडियावर लाईव्ह झाला आणि व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर गोपनीयतेबाबत चर्चा रंगली असून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
The bride and groom unknowingly streamed their private wedding night moments live on social media.
The bride and groom unknowingly streamed their private wedding night moments live on social media.Saam Tv
Published On

मोबाइल आणि सोशल मीडियामुळे आपले जीवन नक्कीच अधिक सोयीस्कर झाले आहे. मात्र, याच सोशल मीडियावर झालेली एक छोटीशी चूकही मोठी ठरू शकते. आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. अशातच सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सध्या लग्नसराई सुरू असून नवरा-नवरीचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका नवविवाहित जोडप्याने त्यांच्या सुहागरातची आठवण म्हणून व्हिडिओ शूट केला. मात्र, चुकून लाईव्ह बटन दाबले गेले आणि हा खासगी क्षण थेट प्रक्षेपित झाला.

The bride and groom unknowingly streamed their private wedding night moments live on social media.
Pakistan Blast: इमारतीत भीषण स्फोट; पाकिस्तान हादरलं! ९ मुलांसह १६ जणांचा मृत्यू, १४ जखमी

व्हिडिओमध्ये लग्नाच्या सर्व विधी पूर्ण करून नवरा-नवरी आपल्या खोलीत येताना दिसतात. दोघेही थकलेले दिसत आहेत. कॅमेरा सुरू असताना नवरी दागिने काढत असते आणि नवरदेव तिला मदत करताना दिसतो. त्याचवेळी दोघांमध्ये हलकासा रोमान्स सुरू होतो. नवरी दागिने काढताना थकून खुर्चीवर बसते, तर नवरदेव तिच्या केसातील क्लिप काढताना दिसतो. मात्र, त्यांना थेट लाईव्ह सुरू असल्याची कल्पना नसावी.

The bride and groom unknowingly streamed their private wedding night moments live on social media.
Shocking : संतापजनक! "तुझी बायको चेटकीण" गावकऱ्यांनी कुटुंबाला जाळलं; दोन महिन्याच्या बाळासह तिघांचा मृत्यू

सोशल मीडियावर या व्हिडिओबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील “आरुषी राहुल ऑफिशियल” या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काहींनी या क्षणाला गोड आणि निरागस म्हटले आहे, तर काहींनी खासगी क्षण सार्वजनिक करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करत जोडप्यावर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com