Manasvi Choudhary
मंगळसूत्र स्टाईल नेकलेस हे युनिक पॅटर्न आहे. आजकाल महिला व मुली या नेकलेसला पंसती देतात.
कुंदन पेंडंट शॉर्ट नेकलेस हे सध्या महिलांना फार आवडते. यामध्ये काळ्या मण्यांच्या दोन नाजूक सरी असतात आणि मध्यभागी कुंदनचे छोटे किंवा मध्यम आकाराचे पेंडंट असते.
सोन्याची 'मणी-माळ' स्टाईल नेकलेसमध्ये तुम्हाला काळ्या मण्यांच्या मध्ये छोटे सोन्याचे मणी गुंफलेले असतात. पेंडंट म्हणून एखादी नाजूक सोन्याची पट्टी किंवा चक्र असते.
जर तुम्हाला सोन्याच्या पिवळ्या रंगापेक्षा काहीतरी वेगळं हवं असेल, तर रोज गोल्ड निवडा रोज गोल्डची चेन, त्यात अधूनमधून काळे मणी आणि मध्यभागी एक पेडंट ठेवा.
जाळीदार 'मेश' पेंडंट नेकलेस सोन्याच्या तारांनी बनवलेले जाळीदार पेंडंट आणि त्याला जोडलेली काळ्या मण्यांची नाजूक माळ असते.
मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आहेत. रोज घालण्यासाठी साडी, कुर्ती आणि वेस्टर्न आऊटफिटवर सूट होतील असे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता..