RBI Repo Rate : रेपो रेट कमी झाले, आता होणार हे ५ फायदे; तुमच्या कर्जाच्या EMI वर काय झाला परिणाम? वाचा

RBI Repo Rate update : रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट कमी करण्यात आले आहेत. या निर्णयाने लोकांना पाच फायदे होणार असल्याचं बोललं जात आहे. आरबीआयच्या निर्णयाने कर्जाच्या EMI वर काय झाला परिणाम? जाणून घेऊयात.
RBI
RBI hikes repo rateSAAM TV
Published On

Repo Rate Cut Impact on EMI : भारतीय रिझर्व्ह बँकेने ५ वर्षांनी रेपो रेटमध्ये कपात केली आहे. चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत भारतीय रिझर्व्ह बँकेने हा मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो रेटमध्ये ०.२५ बेसिस पाँइट्सने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट हा ६.५० टक्क्यांहून कमी होऊन ६.२५ टक्के होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाने सर्वसामान्यांना काय फायदा होणार, जाणून घेऊयात.

आरबीआयने तब्बल ५ वर्षांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. २०२० मध्ये म्हणजे कोराना काळात रेपो रेटमध्ये ०.४० बेसिस पाँइट्सने कपात केली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेट वाढवून ६.५० टक्के केला होता. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून सर्वसामान्य लोक आरबीआयच्या दिलासा देऊ इच्छिणाऱ्या निर्णयाकडे लक्ष देऊन होते. ही दिलासादायक बातमी आरबीआयने ५ वर्षांनी दिली आहे.

RBI
RBI Repo Rate : कर्ज स्वस्त होणार; RBI कडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा | Video

आरबीआयने तब्बल ५ वर्षांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. २०२० मध्ये म्हणजे कोराना काळात रेपो रेटमध्ये ०.४० बेसिस पाँइट्सने कपात केली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेट वाढवून ६.५० टक्के केला होता. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून सर्वसामान्य लोक आरबीआयच्या दिलासा देऊ इच्छिणाऱ्या निर्णयाकडे लक्ष देऊन होते. ही दिलासादायक बातमी आरबीआयने ५ वर्षांनी दिली आहे.

रेपो रेट म्हणजे काय?

आरबीआय अनेक बँकांना कर्ज देते. त्यानंतर या बँका लोकांना कर्ज देतात. आरबीआयकडून कर्ज दिल्यानंतर व्याजदर देखील निश्चित करण्यात येते. या व्याजदराला रेपो रेट म्हटलं जातं. आरबीआयचा रेपो रेट किती असेल, त्यानुसार बँका कर्जाचे व्याजदार ठरवतात. आरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंतर कर्जाचं व्याजदर देखील कमी होतं.

RBI
Union Budget 2025: अर्थसंकल्पाच्या दिवशी बँका अन् शेअर मार्केट सुरू राहणार का? RBI ने दिली महत्त्वाची माहिती

रेपो रेट दर कमी झाल्याने काय फायदा झाला?

रेपो रेट कमी झाल्याने गृह, कारच्या कर्जाचा EMI कमी होणार आहे.

रेपो रेट कमी झाल्याने EMIवरील व्याजदर कमी होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांवरील EMIचा बोजा कमी होणार आहे.

EMI कमी झाल्याने लोकांकडे पैशांची बचत होणार आहे. त्यामुळे लोकांना बाजारात खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध असणार आहे.

रेपो रेट कमी झाल्याने बाजारात पैशांचा पुरवठा (Cash Flow) वाढणार आहे. लोकांकडे अधिक प्रमाणात पैसा येतो, तेव्हा लोक अधिक प्रमाणात खर्च करतात.

बाजारात पैशांचा पुरवठा वाढल्यानंतर वस्तूंची मागणी वाढते. यामुळे देशात नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता वाढते.

RBI
Home Loan EMI: होम लोन घेणाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी; ५ वर्षानंतर कमी होणार EMI

तुमच्या कर्जाच्या हप्त्यावर काय परिणाम झाला? वाचा

उदा. तुम्ही ८.५० टक्के दराने ५० लाखांचं कर्ज घेतलं असेल. हे कर्ज २० वर्षांसाठी असेल. तुम्हाला त्यावर दरमहा २६,०३५ रुपये EMI भरावा लागत होता. मात्र, आता आरबीआयच्या निर्णयानुसार,दरमहा हप्ता २५,५६२ रुपये होणार आहे. यामुळे दरमहा ४७३ रुपयांची बचत होणार आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com