MP Salary: खासदारांचा वाढला पगार, महागाई भत्ताही वाढला; जाणून घ्या तुमच्या MP ला किती मिळणार मानधन?

Central Government Increased MP Salary: आता खासदारांना दरमहा 1, 24000 रुपये मिळणार आहेत. आधी पूर्वी १ लाख रुपये होते. खासदारांचा दैनंदिन भत्ताही 2,000 रुपयांवरून 2,500 रुपये करण्यात आलाय.
Central Government   Member Of Parliament
Central Government Increased MP Salary
Published On

देशातील जनता वाढत्या महागाईच्या बोझ्या खाली दबत आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने खासदारांच्या पगारात मोठी वाढ केलीय. इतकेच नाहीतर सरकारने माजी खाजदारांच्या पेन्शनमध्येही वाढ केलीय. ही पगारवाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू झालीय. कर्नाटक सरकारने आमदारांच्या पगारात शंभर टक्के वाढ केली. कर्नाटक विधानसभेत आमदारांच्या वेतन भत्त्यांवरून जोरदार चर्चा झाली होती. कर्नाटकातील आमदारांचा पगार वाढवण्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी केंद्राने खासदारांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला.

आता खासदारांना दरमहा 1, 24,000 रुपये मिळतील. आधी त्यांचा पगार 1 लाख रुपये होता. पगारवाढीसह खासदारांचा दैनंदिन भत्ताही वाढवण्यात आलाय. यात 500 रुपये वाढवण्यात आली आहेत. यानुसार, 2,500 रुपये वाढ करण्यात आलीय. माजी खासदारांची पेन्शन 25 हजार रुपयांवरून 31 हजार रुपये प्रति महिना करण्यात आलीय.

Central Government   Member Of Parliament
Muslim Reservation: मुस्लीम आरक्षणासाठी संविधान बदलणार; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर संसदेत गदारोळ

ही वाढ संसद सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन अधिनियम, 1954 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत करण्यात आलीय. हे आयकर कायदा, 1961 मध्ये निर्दिष्ट केलेल्या महागाई निर्देशांकावर आधारित आहे. केंद्र सरकारने वेतन वाढीची आधिसुचना जारी केलीय. संसदीय कार्य मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार, खासदारांचं वेतन महागाई निर्देशांकानुसार वाढवण्यात आलीय. यात 24टक्क्यांची वाढ करण्यात आलीय, ही पगारवाढ 2o23पासून लागू झालीय.

Central Government   Member Of Parliament
Unemployment Engineer : ८३ टक्के इंजिनीअर बेरोजगार; धक्कादायक कारण आलं समोर

माजी खासदारांचे अतिरिक्त पेन्शनमध्ये वाढ करण्यात आलीय. जे खासदारांनी अनेक वर्ष खासदारकीय भुषवलीय, त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आलीय. त्यामुळे अतिरिक्त पेन्शनमध्ये 2500 रुपयांची वाढ करण्यात आलीय. याआधी खासदारांना 2000 रुपये मिळत होते. वेतन आणि भत्त्यातील वाढ 2018 नंतर करण्यात आलीय. यात खासदारांच्या वेतनात आणि भत्त्याचा आढावा पाच वर्षानंतर घेतला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com