
रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने (RBI) एचडीएफसी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेने ७५ लाखांचा दंड ठोठावला आहे. एचडीएफसी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या काही नियमांचे पालन केले नाही. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेने हा मोठा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँकेने सांगितल्याप्रमाणे, HDFC बँकेने केवायसीसंदर्भात काही नियमांचे पालन केले नाही. त्यांच्या गाइडलाइन्सचे पालन केले नाही. त्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे.
आरबीयच्या मते, एचडीएफसी बँकेने काही ग्राहकांना जोखिम श्रेणीनुसार वर्गीकृत केले नाही. ग्राहकांना कमी, मध्यम किंवा उच्च जोखीम या तीन कॅटेगरीत वर्गीकृत करायचे असते. तसेच काही ग्राहकांना युनिका आयडेंटिफिकेशन कोड देण्याऐवजी अनेक आयडेंटिफिकेशन कोड दिले आहे. हे आरबीआयच्या गाइडलाइन्समध्ये हे बसत नाही.
आरबीआयचा एनबीएफसीलादेखील दंड (NBFC)
आरबबीआयने केएलएम अॅक्सिवा फिनवेस्टलादेखील दंड ठोठावला आहे. तब्बल १० लाखांचा दंड आहे. ही एक नॉन डिपॉझिट नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) आहे. या कंपनीनेदेखील RBI (NBFC-Scale Based Regulation), Direction 2023 अंतर्गत डिविडेंटसंबंधित नियमांटे पालन केले नाही. त्यामुळे या कंपनीलाही दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे
देशातील सर्व सरकारी आणि प्रायव्हेट क्षेत्रातील बँकांना रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचे गाइडलाइन्सचे पालन करणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बँक ही बँकांसाठीचे नियम ठरवते. त्यानुसारच बँकांना सर्व व्यव्हार करायचे असतात. जर बँकांनी नियमांच्या विरोधात जाऊन कामे केली तर त्यांना दंड भरावा लागतो. याआधीही रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांना दंड ठोठावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.