१०० आणि २०० च्या नव्या नोटा येणार! RBI चा मोठा निर्णय; जुन्या नोटांचं काय होणार?

RBI Changes 100 and 200 Rupees Notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. आता १०० आणि २०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार आहेत. या नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असणार आहे.
RBI
RBISaam Tv
Published On

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) काल मोठी घोषणा केली आहे. १०० आणि २०० रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता १०० आणि २०० रुपयांच्या नोटा बदलण्यात येणार आहेत. त्या लवकरच चलनात सक्रिय होणार आहे.

RBI
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून कमवा २ लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर

आता १०० आणि २०० रुपयांच्या नोटांवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असणार आहे. त्यानंतर आता नोटा लाँच केल्या जाणार आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेने निवेदन जारी केले आहेत. या नवीन नोटांची रचना ही महात्मा गांधी यांच्या सीरीजमधील नोटांसारखीच असणार आहे.

रिझर्व्ह बँकेने पूर्वी जारी केलेल्या १०० आणि २०० रुपयांच्या नोटा कायदेशीर चलन म्हणून चालू राहतील. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन नोटांची खासियत (New Notes)

या नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असणार आहे.

या नोटांची डिझाइन ही जुन्या सीरीजनुसार असणार आहे.

या नवीन नोटांचे रंग, पॅटर्न सर्वकाही सारखे असणार आहे.

जुने १०० ते २०० रुपये मान्य असणार आहे.

RBI
PM Internship Scheme: तरुणांना दर महिन्याला मिळणार ६००० रुपये; PM इंटर्नशिप योजनेत काम करण्याची संधी; अर्ज कसा करावा?

जुन्या नोटांचं काय होणार?

१०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात येणार आहे. मात्र, जुन्या १०० आणि २०० रुपयांच्या नोटांचं काय होणार याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. जुन्या नोटा या चलनात सक्रिय राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही या नोटा वापरु शकतात. याचसोबत ५० रुपयांच्या नोटांवरदेखील गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असणार आहे.

RBI
Bank Holidays: मार्च महिन्यात तब्बल १३ दिवस बँका बंद; RBI ने जारी केली सुट्ट्यांची यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com