Saam Tv
महिलांसाठी विशेष असणारा आज महिला दिन आहे. या राशीच्या महिलांना विशेष पराक्रम चांगला असणारा दिवस जाईल.
वडिलांच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. वडिलोपार्जित संपत्ती विषयी महत्त्वाचे निर्णय आज होतील. घरी पाहुण्यांची ऊठबस राहील.
बोलण्यामध्ये आपला हात कोणी पकडू शकत नाही. सहज साध्य गोष्टी आज होतील. इतरांना आपलेसे करण्याची कला आज साधाल.
सहज साध्या गोष्टीत नाराजी येते. आज मात्र काही घटना त्रासदायक घडू शकतात. मनस्वास्थ्य ठीक राहण्यासाठी अध्यात्मिक उपासना करा.
आज महिला दिनानिमित्त स्त्रियांसाठी विशेष चांगल्या घटना घडतील. जुन्या केलेल्या गोष्टीचे लाभ आज पदरात पडणार आहेत. मैत्र सुखामध्ये रहाल.
प्रवासाला जाण्याचे बेत आखाल. अधिक करून कामासाठी बाहेर जाण्याचे योग आहेत. प्रसिद्धी, सन्मानाच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ संकेत घेऊन आलेला आहे.
देवी उपासना आज फलदायी ठरेल. तूळेच्या महिलांना दिवस चांगल्या गोष्टी आणि चांगल्या माणसांना घेऊन आलेला आहे. अनेक सुवार्ता कानावर येतील. दिवस भाग्यकारक राहील.
धडपडून काम कराल. कधी कधी अशी भावना येते "दैव जाणिले कुणी" पण तरी नेटाने गोष्टी पुढे न्यावा लागतात. पदरात कदाचित अपयश येईल पण नाराज न होता पुढील सुयोग्य संधीची आज वाट पाहा.
कोर्टामध्ये रखडलेली कामे आज सहज मार्गी लागतील. मातृ सुखासाठी दिवस चांगला आहे. कामाचा व्याप वाढता राहील. दिवस संमिश्र आहे.
विनाकारण त्रास आणि कटकटी मागे लागण्याचा आजचा दिवस आहे. प्रवासामध्ये अडथळे येतील. नोकरीत मात्र सचोटीने काम कराल. कनिष्ठ लोकांकडून सहकार्य मिळेल.
शिव उपासना आज फलदायी ठरेल. शेअर्समधील गुंतवणुकीमुळे धनयोग वाढता राहील. प्रेमात यश नक्कीच आहे.
जोडीदाराच्या कार्यक्षेत्रा विषयी चिंता असतील तर आज त्या सुरळीत होतील. जमिनीच्या व्यवहारामधून आज फायदा होईल. सर्व सुखांच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.