PM Internship Scheme: तरुणांना दर महिन्याला मिळणार ६००० रुपये; PM इंटर्नशिप योजनेत काम करण्याची संधी; अर्ज कसा करावा?

PM Internship Scheme News: केंद्र सरकारने पीएम इंटर्नशिप योजना सुरु केली आहे. या योजनेत तरुणांना चांगल्या कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे.
PM Internship Scheme
PM Internship SchemeSaam Tv
Published On

केंद्र सरकारने तरुणांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. केंद्र सरकारने पीएम इंटर्नशिप योजना सुरु केली. या योजनेत तरुणांना चांगल्या कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळते. या योजनेत सध्या रजिस्ट्रेशन सुरु आहे. या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर १२ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करावेत. यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही.

PM Internship Scheme
Atal Pension Scheme: जबरदस्त योजना! दररोज फक्त ७ रुपये गुंतवा अन् महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळवा

पीएम इंटर्नशिप योजनेत मंत्रालयाद्वारे अर्ज स्विकारले जात आहेत. या योजनेसाठी ८०० कोटी रुपये दिले जातात. या योजनेत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कामाची संधी आणि त्याचसोबत रोजगार उपलब्ध केला जाणार आहे.

पीएम इंटर्नशिप योजनेत ६००० रुपये मासिक स्टायपेंड दिली जाते. या योजनेअंतर्गत तुम्हाला ५०० कंपनीत काम करण्याची संधी मिळते. या योजनेत २१ ते २४ वयोगटातील तरुण अर्ज करु शकतात. या योजनेत १०वी, १२वी आणि ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे.

या योजनेत जे लोक फुल टाइम जॉब करत आहेत ते पात्र नाहीत. ज्या तरुणांना आपल्या करिअरची चांगली सुरुवात करायचीये त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. पीएम इंटर्नशिप योजनेचा लाभ घेतल्यावर कौशल्य आणि इतर ज्ञान मिळेल.

PM Internship Scheme
Post Office Scheme: पोस्टाच्या 'या' योजनेत एकदाच करा गुंतवणूक, दर महिन्याला मिळतील ५,५५० रुपये

योजनेत अर्ज कसा करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी pminternship.mca.gov.in अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल.

त्यानंतर होमपेजवरील रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. त्यानंतर माहिती भरा.

यानंतर तुम्हाला अकाउंटमध्ये लॉग इन करावे लागेल. यानंतर नियम वाचावेत. त्यानंतर अर्ज सबमिट करावा. यानंतर या अर्जाची कॉपी तुमच्याजवळ ठेवा.

PM Internship Scheme
Tax Saving Schemes: टॅक्स वाचवायचाय? या १० सरकारी योजनांना ठरतील फायद्याच्या, कर तर वाचेलच सोबत मिळेल जबरदस्त परतावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com