Aadhaar Update Saam Tv
बिझनेस

Aadhaar Update: आधार अपडेटचा नवीन नियम! आता घरबसल्या करा कौटुंबिक माहितीत बदल, प्रोसेस काय? वाचा सविस्तर

Aadhaar Update Online Process: आधार अपडेट करण्याची ऑनलाइन प्रोसेस सुरु आहे. आधार अपडेट करताना तुम्ही जन्मतारीख, नाव वैगेरे अपडेट करु शकतात.

Siddhi Hande

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. प्रत्येकाकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. आधार कार्ड तुम्हाला १० वर्षांनी अपडेट करावेच लागते. जर तुम्हाला आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर ते तुम्ही घरबसल्या करु शकतात. तुम्हाला आता तुमच्यासोबतच कुटुंबियांचेदेखील आधार कार्ड अपडेट करता येणार आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) हे नवीन पाऊल उचलले आहे. डिजिटल आधार सेवांना अधिक सुलभ बनवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यामुळे आता घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत तुम्ही आधार अपडेट करु शकणार आहात.

कोणत्या कोणत्या डिटेल्स ऑनलाइन अपडेट होणार?

आता तुम्ही myAadhaar पोर्टलवर जाऊन नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख ही माहिती अपडेट करु शकणार आहेत. नोव्हेंबरपासून आता तुम्ही अजून काही महत्त्वपूर्ण बदलदेखील करु शकणार आहात.

नावामध्ये बदल करता येणार आहे. यामध्ये स्पेलिंगमध्ये दुरुस्ती किंवा संक्षिप्त नाव

जन्मतारीख अपडेट- तुम्ही तुमच्या जन्मतारखेतदेखील बदल करु शकतात.

कुटुंबाची माहिती- तुम्ही तुमच्या कुटुंबाची माहितीदेखील अपडेट करु शकतात. पत्नीचे नाव किंवा वडिलांच्या नावात काही बदल असतील तर करु शकतात.

रहिवासी पत्त्यात बदल- तुम्हाला तुमचा घरचा पत्ता अपडेट करता येणार आहे.

याचसोबत तुम्ही ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरदेखील अपडेट करु शकतात.परंतु यासाठी ऑनलाइन सुविधा सुरु केलेली नाही. लवकरच ही सुविधा सुरु होईल.

आधार अपडेट कसं करायचं?

सर्वात आधी myAadhaar पोर्टलवर लॉग इन करा.

यानंतर तुमच्या फोनवर आलेला ओटीपी टाका.

यानंतर कागदपत्रे अपलोड करा.

यानंतर UIDAI सिस्टीममध्ये व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अपडेट करु शकतात.

तुम्ही अपडेट केल्यानंतर त्याची डिजिटल कॉपी डाउनलोड करु शकतात. यासाठी रिक्वेस्ट ३-५ दिवसांच्या वर्किंग डेमध्ये प्रोसेस केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? आत्ताच हा यशाचा मंत्र लक्षात ठेवा

Thane : आई की, हैवान? ठाण्यातील महिलेचा लेकीला अमानुष मारहाण करतानाचा Video Viral

Tomato Shave Bhaji Recipe : एक टोमॅटो अन् वाटीभर शेव, रात्रीच्या जेवणाला झटपट बनवा 'हा' पदार्थ

Ashadhi Wari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याला अमानुष मारहाण, पंढरपुरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी|VIDEO

SCROLL FOR NEXT