Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Uddhav thackeray on Ladki Bahin Yojana : उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारवर निशाणा साधला.
uddhav thackeray on ladki bahin yojana
ladki bahin yojana Saam tv
Published On

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी निधी इतर विभागाकडून वळवण्यात येत आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी निधीची कमतरता भासत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. सध्या योजनेत लाभार्थी असलेल्या महिलांना १५०० रुपयांचा हप्ता कुठून द्यायचा, असा प्रश्न सरकारपुढे असताना पोर्टलवर नव्याने नोंदणी होणार नसल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दावा केला आहे. ठाकरेंच्या दाव्यानंतर लाडकी बहीण योजनेवरून उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

uddhav thackeray on ladki bahin yojana
Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

आज मुंबईच्या वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा' पार पडला. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजय मेळाव्यात एकत्र येत सरकारवर तोफ डागली. उद्धव ठाकरे यांनी सरकार तुफान टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही महायुती सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, 'लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता नव्याने नोंदणी होणार नाहीत. आता बसा बोंबलत. देशात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र थांबणार नाही. कर्ज काढतच राहणार'.

uddhav thackeray on ladki bahin yojana
Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर जय गुजरातची घोषणा केली. यावरूनही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. काल एक गद्दार बोलला... जय गुजरात... किती लाचारी, अशा शब्दात ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. 'संकट आल्यावर मराठी माणूस एकत्र येतो. पण संकट गेल्यानंतर मराठी माणूस एकमेकांशी भांडतो. पण संकट गेल्यानंतर मराठी माणूस एकमेकांशी भांडतो, आता असा नतद्रष्टपणा करायचा नाही', असे ते म्हणाले.

uddhav thackeray on ladki bahin yojana
Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

'आम्ही हिंदीला मानणार नाही. भाजपकडून एक विधान एक प्रधान, असं सांगितलं जायचं. नंतर वन नेशन, वन इलेक्शन ही थीम काढण्यात आली. आता त्यांनी हिंदी, हिंदू, हिंदूस्थानची घोषणा दिली. या सर्व गोष्टी आम्हाला मान्य आहेत. पण हिंदी आम्हाला मान्य नाही, असे ठाकरे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com