PF Interest Rate
PF Interest RateSaam Tv

PF फॉर्ममध्ये तुमचं नाव, जन्मतारीख चुकलीय? घरी बसून करा दुरुस्त

Provident Fund : जर पीएफ खात्यात नाव आणि जन्मतारीख चुकली असेल तर काळजी करण्याची गरज नाहीये. घरबसल्या ईपीएफओ खात्याचे तपशील ऑनलाइन अपडेट करू शकतात.
Published on

पीएफ (प्रॉव्हिडंट फंड) खाते प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी खूप महत्वाचे आहे. परंतु जर तुमचे नाव, जन्मतारीख किंवा वडिलांचे नाव या खात्यात चुकीचे प्रविष्ट केले असेल तर भविष्यात क्लेम करणं, पेन्शन आणि इतर सुविधा घेताना समस्या येऊ शकतात.

तुम्ही घरबसल्या या चुका ऑनलाइन दुरुस्त करू शकता. पीएफ खात्यातील चुकीचे नाव, जन्मतारीख किंवा वडिलांचे नाव दुरुस्त करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करा, कोणती कागदपत्रे आवश्यक असतील.

ईपीएफओ वेबसाइटवर, तुम्ही हे तपशील अपडेट करू शकता: नाव, जन्मतारीख, वडिलांचे/पतीचे नाव, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल आयडी देखील अपडेट करू शकतात.

पीएफ तपशील ऑनलाइन कसे अपडेट करावे

EPFOची Unified Member Portal https://unifiedportal-mem.epfindia.gov.in ला भेट द्या. यानंतर, तुमचा UAN, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा.

त्यानंतर प्रोफाइल विभागात जा

लॉगिन केल्यानंतर, “Manage” टॅबवर क्लिक करा आणि नंतर “Modify Basic Details” निवडा. आता दुरुस्तीची आवश्यकता असलेली माहिती भरा.

कागदपत्रे अपलोड करा

योग्य माहिती सिद्ध करण्यासाठी संबंधित कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा. आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शालेय प्रमाणपत्र, बँक पासबुक आवश्यक असेल.

सबमिट करा आणि मंजूर करा

तपशील अपडेट केल्यानंतर, तुमचा अर्ज तुमच्या नियोक्त्याकडे जाईल. नियोक्त्याने मंजुरी दिल्यानंतर, EPFO ​​द्वारे त्याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर, तुमचा पीएफ तपशील दुरुस्त केला जाईल.

पीएफ क्लेम अधिक सोपे होणार आहे. जर फक्त तुमच्या तारखांचा मेळ बसत नाहीये त्यामुळे तुमचा पीएफ रिजेक्ट होणार नाही. अनेकदा एकाच दिवशी पीएफ क्लेमच्या तारखा ओवरलपिंग व्हायच्या. त्यामुळे क्लेम रिजेक्ट केले जायचे. आता असं काहीही होणार नाही. याबाबत ईपीएफओने माहिती दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com