
आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्डशिवाय अनेक सरकारी कामे होत नाहीत. त्यामुळे तुमचे आधार कार्ड नेहमी तुमच्याजवळ असावे. याचसोबत आधार कार्डमधील सर्व माहिती अपडेट केलेली असावी. जर तुमच्या आधार कार्डमधील सर्व माहिती अपडेट नसेल तर तुम्हाला भविष्यात खूप नुकसान होऊ शकते.
जर तुमचे आधार कार्ड १० वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ते अपडेट करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केले नाही तर तुम्हाला अनेक योजनांचा लाभ मिळणार नाही. जर तुम्ही असं केलं नाही तर तुमचे आधार कार्ड बाद केले जाऊ शकते.
आधार कार्ड अपडेट का गरजेचे?
आधार कार्ड ही प्रत्येक भारतीय व्यक्तीची डिजिटल ओळख असते. आधार कार्डच्या तुमच्या सर्व कामांशी संबंध असतो. शाळा-कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यापासून ते बँकेच्या सर्व कामांसाठी आधार कार्ड महत्त्वाचे आहे.याचसोबत एलपीसजी सब्सिडी, योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा रेशन कार्डसंबंधित कामांसाठी आधार कार्ड गरजेचे आहे.
मागील १० वर्षात तुमच्या बायोमॅट्रिक, डेमोग्राफिक डेटामध्ये बदल होऊ शकतो. अनेकदा फोटो, फिंगरप्रिंटमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला भविष्यात फटका बसू शकतो. यामुळे तुमची अनेक सरकारी कामे होत नाही. त्यामुळे आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करावे.
आधार कार्डमध्ये कोणती माहिती अपडेट करायची?
आधार कार्डमध्ये तुमची बायोमॅट्रिक माहिती जसे की फिंगरप्रिंट, डोळ्याचे स्कॅनिंग, पत्ता, नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी ही माहिती तुम्ही अपडेट करु शकतात. तुम्हाला अनेकदा आधार कार्डची गरज पडते. रेशन कार्ड किंवा पीडीएसद्वारे धान्य मिळणे बंद होऊ शकते. एलपीजी सब्सिडी बंद होऊ शकते. तसेच अनेक योजनांचे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे येणारे पैसेदेखील मिळणार नाही. याचसोबत वोटिंग कार्डसाठीही आधार कार्ड गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.