
UIDAI च्या सोशल मीडिया अंकाउंटवर आधार कार्डाविषयी मुख्य बातमी शेअर केली आहे. तुम्हाला तुमचे आधार कार्ड मोफत myAadhhar या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध असेल. तसेच ऑनलाइन पोर्टलच्या मदतीने तुम्ही त्यातील माहिती दुरुस्त सुद्धा करू शकता. आधार कार्ड मोफत मिळण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. तुम्हाला तुमचे आधार कार्ड (Aadhaar Card) नवीन अथवा त्यात काही बदल करून हवे असल्यास तुम्ही मोफत करू शकता.
तुम्हाला आता वर्षभरात आधार कार्डात कोणतेही बदल मोफत करता येणार आहेत. त्यानंतर कोणताही बदल करायचा असल्यास तुमच्याकडून शुल्क आकारले जाणार आहे. याबद्दलची संपुर्ण माहिती UIDAI च्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. UIDAI च्या लाखो आधार होल्डर्ससाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. १४ जून २०२६ पर्यंत शेवटची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत वाढवण्यात आली आहे.
तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डात काही बदल करायचा असल्यास UIDAI च्या अधिकृत वेबसाईटचा वापर करू शकता. तसेच UIDAI च्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म 'एक्स' वर तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते. तुम्ही myAadhhar या पोर्टलवर तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता. महत्वाचे म्हणजे तुम्ही घरबसल्या सुद्धा तुमची माहिती अपडेट करू शकता.
महत्वाची माहिती
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला महत्वाची कागदपत्रे आणि अचूक माहिती लागते. त्यासाठी तुम्हाला पत्ता आणि ओळख पुराव्याशी संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ही सर्व प्रक्रिया तुम्ही या वर्षी मोफत करू शकता. मात्र ऑनलाइन अपडेटमध्ये मर्यादित सुविधाच उपलब्ध असतील. जर एखाद्या आधार धारकाला त्याचे बायोमेट्रीक अपडेट करायचे असेल तर त्याला जवळच्या आधार सेवा केंद्रात जावे लागेल आणि शुल्क भरल्यानंतर हे काम करता येईल.े
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.