Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला ऑनलाईन सातबारा आणि तुमचे स्टेटस पाहायचे असेल तर तुम्ही पुढील अगदी सोप्या स्टेप्स फॉलो करा.
सगळ्यात आधी mahabhumilink किंवा bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईट ओपन करा.
पुढे 'Mahabhumi Abhilekh' किंवा 'Satbara Utara'पर्यायावर जा. मग ई ७/१२ किंवा डिजिटल सातबारा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
पुढे तुमचे ठिकाण जिल्हा, तालूका निवडा, गावचे नाव व्यवस्थित निवडा.
पुढे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यातले गट क्रमांक , सर्वे नंबर, जमिनधारकाचे नाव जी माहिती असेल ती भरा.
आता तुम्हाला कॅप्चा कोड येईल तो भरून search वर क्लिक करा.
पुढे तुम्हाला सातबारा उतारा स्क्रीनवर दिसेल. तिथे तुम्ही जमिनीचे तपशील पाहू शकता. तसेच तुम्ही PDF सुद्धा डाउनलोड करू शकता.