सागर निकवाडे
नंदुरबार : सोयाबीन काढणीला अनेक दिवस झाले. मात्र भाव नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता घरात भरून ठेवला होता. मात्र दिवाळीनंतर (Soyabean) सोयाबीनच्या दरात काहीशी वाढ (Nandurbar) झाल्याने शेतकरी आता बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीसाठी आणत आहे. यामुळे शहादा बाजार समितीमध्ये आवक वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे. (Maharashtra News)
नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख सोयाबीन खरेदीसाठी असलेल्या बाजारपेठ म्हणून शहादा आणि नंदुरबार बाजार समितीची ओळख आहे. या दरम्यान दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात थोडी वाढ झाल्याने बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आवक वाढली असून शहादा बाजार समितीमध्ये आतापर्यंत २९ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. तर सोयाबीनला ५१०० ते ५३०० पर्यंत भाव मिळत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दुसरीकडे नंदुरबार बाजार समितीमध्येही (Bajar Samiti) मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक होत असून नंदुरबारलाही भाव वाढ झाल्याने दोघी बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. याच्याकडे सोयाबीनचे दर वाढण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांनाही मात्र लहान शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक न करता सोयाबीन विक्रीला प्राधान्य दिले असल्याचे चित्र बाजार समितीमध्ये दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.