Soyabean Sale: माजलगाव येथील मोंढ्यात सोयाबीन खरेदीचा विक्रम; ६२ कोटीचे सोयाबीनची खरेदी

Beed News : सुरुवातीला ४ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी भावात विकणाऱ्या सोयाबीनला हळूहळू भाव चांगला मिळू लागला
Soyabean Sale
Soyabean SaleSaam tv
Published On

बीड : बीडच्या माजलगाव शहरातील मोंढा मार्केटमध्ये सोयाबीनची आवक प्रचंड वाढली आहे. यामुळे गेल्या (Beed) दीड महिन्यात तब्बल ६२ कोटी रुपयांचे सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. या काळात १ लाख ३६ हजार १०० क्विंटल इतक्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती (Bajar Samiti) बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांनी दिली. (Breaking Marathi News)

Soyabean Sale
Nandurbar News : ट्रांसफार्मर फेल झाल्याने तीन दिवसांपासून १२ गावे अंधारात; वीजवितरक कंपनीचे दुर्लक्ष

पाऊस कमी झाल्यामुळे यंदा बीड जिल्ह्यात दुष्काळ पडलाय. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनला काय भाव मिळत आहे? याची परवा न करता सोयाबीन विक्री केली. त्यामुळे मागील दीड महिन्यात माजलगावच्या मोंढ्यात १ लाख ३८ हजार १०० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. सुरुवातीला ४ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी भावात विकणाऱ्या सोयाबीनला हळूहळू भाव चांगला मिळू लागला. त्यामुळे (Farmer) शेतकरी सोयाबीन घरी ठेवण्याऐवजी तात्काळ विक्री करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Soyabean Sale
Dhule Crime: तरुणीच्या हत्येनंतर आढळला तरुणाचा मृतदेह; एकाच परिसरातील घटनेने खळबळ

माजलगावच्या मोंढ्यात यावर्षी ५ हजार ५० रूपये सरासरीने सोयाबीनला ५ हजार १०९ रुपये सर्वात जास्त भाव मिळाला. तर ४ हजार ५०० रुपये सर्वात कमी भाव मिळाला. १ ऑक्टोंबर रोजी सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात करण्यात आली होती. १७ नोव्हेंबरपर्यंत ६२ कोटी ३७ लाख ८ हजार ९३४ रूपयांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com