Dhule Crime
Dhule CrimeSaam tv

Dhule Crime: तरुणीच्या हत्येनंतर आढळला तरुणाचा मृतदेह; एकाच परिसरातील घटनेने खळबळ

Dhule News : रात्री झालेल्या तरुणीच्या हत्येप्रकरणात तरुणाचा देखील काही संबंध आहे का? या संदर्भात आता तर्कवितर्क लडविले जात आहेत. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपस
Published on

धुळे : धुळे शहरात तरुणीची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर त्याच रात्री एका तरुणाचा मृतदेह (Dhule News) आढळून आला आहे. एकाच रात्री या दोन घटना एकाच परिसरात घडल्यामुळे परिसरामध्ये एकच (Crime News) खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.  (Tajya Batmya)

Dhule Crime
Bhandara Crime: भंडारा जिल्ह्यात ८ दिवसात विनयभंगाच्या ३ घटना; आरोपींना पोलिसांचा धाक नाही?

धुळे शहरात पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर त्याच परिसरामध्ये आज सकाळी तरुणाचा देखील मृतदेह आढळून आला. या तरुणाच्या मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली देखील पोलिसांना आढळून आली आहे. त्यामुळे रात्री झालेल्या तरुणीच्या हत्येप्रकरणात तरुणाचा देखील काही संबंध आहे का? या संदर्भात आता तर्कवितर्क लडविले जात आहेत. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपस सुरु आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule Crime
Nandurbar News : ट्रांसफार्मर फेल झाल्याने तीन दिवसांपासून १२ गावे अंधारात; वीजवितरक कंपनीचे दुर्लक्ष

पोलीस प्रशासनातर्फे डॉग पथकासह इतर तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मृतदेहाचा पंचनामा करून पोलीस प्रशासनातर्फे या दोन्ही तरुण-तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे हा तपास केला जात असून, एकाच रात्री या दोन घटना एकाच परिसरात घडल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com