Bhandara Crime: भंडारा जिल्ह्यात ८ दिवसात विनयभंगाच्या ३ घटना; आरोपींना पोलिसांचा धाक नाही?

Bhandara News : गुन्हा घडू नये असा धाक आरोपीत निर्माण करीत नाही. किंबहुना आरोपींना पोलिसांचा धाक राहिला नाही
Bhandara Crime
Bhandara CrimeSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: महिला, तरुणींचे शोषण होत असल्याच्या घटना अजूनही थांबत नाहीत. दिवसेंदिवस यात वाढ होत असल्याचेच पाहण्यास मिळत आहे. असेच प्रकार (Bhandara) भंडारा जिल्ह्यात मागील आठ दिवसात पाहण्यास मिळाले. भंडारा जिल्ह्यात सलग ८ दिवसात महिलांचे शोषण करण्याचा घटना घडल्या आहे. त्यामुळे (Crime News) जिल्ह्यात महिला आणि मूली कितपत सुरक्षित असा प्रश्न विचारला जात आहे. (Maharashtra News)

Bhandara Crime
Buldhana News : विजेचा शॉक लागून 2 तमाशा कलावंतांचा मृत्यू, बुलडाण्यातील यात्रेदरम्यानच्या घटनेने हळहळ

गावात मंडई असल्याने मामेभावासोबत रात्री तरुणी मंडई बघण्यासाठी गेली होती. तरुणी व तिचा मामेभाऊ रस्त्यावर उभे असताना १५ ते १७ तरुण त्यांच्याजवळ आले व त्यांनी तरुणीचा विनयभंग केला. यानंतर तरुणांनी दोघांनाही काठीने बेदम मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाली. पीडितेला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी आठ तरुणांविरूद्ध गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या प्रकरणात आपल्या मनोरंजनासाठी बीड गावात नृत्यागणावर पैसे उधळताना चक्क एक सभापतीच सरसावला आहे.  तिसऱ्या घटनेत नाकाडोंगरी येथे आपल्या मनोरंजनासाठी चक्क एका महिला नृत्यागणेला विवस्त्र नृत्य करण्यास भाग पाडल्याची घटना घड़ली आहे. या तिन्ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhandara Crime
Hingoli News : ४८ तासांपासून युवक पाण्याच्या टाकीवरच; ग्रामस्थ व पोलीसही विनंती करून थकले, भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन

भंडारा पोलिसांनी या घटना घडल्यानंतर आपले सोपस्कार पार पडले आहे. बेटाड्यात टोळक्याद्वारे मारहाण प्रकरणी मोहाडी पोलिसांनी ८ लोकांना ताब्यात घेतले आहे. तर गोबरवाही नृत्य डान्सप्रकरणी आयोजकाला अटक करण्यात आली आहे. ठाणेदाराची बदली तर २ पोलिसांचे निलंबनही प्रशासकीय कारवाई सुद्धा झाली आहे. जिल्ह्यात पोलिस गुन्हा घडल्यानंतर कारवाई करतांना दिसत आहे. मात्र गुन्हा घडू नये असा धाक आरोपीत निर्माण करीत नाही. किंबहुना आरोपींना पोलिसांचा धाक राहिला नाही. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com