Hingoli News : ४८ तासांपासून युवक पाण्याच्या टाकीवरच; ग्रामस्थ व पोलीसही विनंती करून थकले, भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन

Hingoli News : तक्रारीची दखल न घेता प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने त्यांनी हे शोले स्टाईल आंदोलन
Hingoli News
Hingoli NewsSaam tv
Published On

हिंगोली ; हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील वडचुना गावात प्रशासनाच्या विरोधात एका युवकाने पाण्याच्या टाकीवर (hingoli) चढत शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. हा युवक गेल्या ४८ तासापासून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाला बसला आहे, ग्रामस्थ या युवकाला खाली उतरण्यासाठी विनंती करत असूनही माघार घेण्यास तयार नाही. (Latest Marathi News)

Hingoli News
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी निमित्त बोंबल्या विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी; देहू, आळंदीसह शेगावात भक्तांचा लाेटला सागर

रमेश सोनाजी बर्डे असे या आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या युवकाचे आंदोलन सुरू असलेल्या वडचुना गावात लाखो रुपये खर्चून जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामात मोठा (Police) गैरप्रकार झाला आहे. या प्रकरणाची तक्रार बर्डे यांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र त्यांच्या तक्रारीची दखल न घेता प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने त्यांनी हे शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे, 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hingoli News
Baby Born With 24 Fingers : तब्बल 24 बोटांचे बाळ जन्मले; दुर्मिळ घटनेची धाराशिवात चर्चा (पाहा व्हिडिओ)

तर टाकीवरून उडी मारायचा इशारा 

दरम्यान औंढा पोलिसांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन रमेश बर्डे यांची समजूत काढून त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्रारीची दखल घेऊन कार्यवाही होत नाही; तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या आंदोलक तरुणाने घेतला आहे. पोलिसांनी खाली उतरण्यासाठी जबरदस्ती केली, तर आपण टाकीवरून खाली उडी मारू असा इशारा टाकीवर चढलेल्या या युवकाने पोलिसांना दिल्याने पोलीस देखील आता रिकाम्या हातानेच खाली उतरले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com