निरा भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात कोसळलेल्या दोघांचेही मृतदेह शोधण्यात स्थानिक नागरिकांसह प्रशासनाला यश आले. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार अनिल बापूराव नरूटे (Anil Bapura Narute) आणि रतिलाल बलभीम नरोटे (Ratilal Balbhim Barute) अशी मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. ते इंदापूर तालुक्यातील काझड येथील सिध्देश्वर वस्ती येथील रहिवासी हाेते. (Maharashtra News)
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काझड येथे निरा भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात इंदापूर तालुक्यातील दोन शेतकरी कोसळल्याची धक्कादायक घटना काल रात्री उशिरा घडली होती. या दोघांचा रात्री उशीरापर्यंत शोध सुरु होता. अखेर रात्री साडेअकरा पावणेबाराच्या सुमारास या दोघांचेही मृतदेह शोधण्यात स्थानिक नागरिकांसह प्रशासनाला यश आले आहे.
मराठवाड्याच्या सात टीएमसी पाण्यासाठी सुरू असलेल्या कृष्णा जलस्थिरीकरणाच्या कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या बोगद्यात पडून ही दुर्दैवी घटना घडली आहे. काझड गावचे हद्दीत नदी जोड प्रकल्प अंतर्गत चालू असलेल्या बोगद्याचे कामाचे ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने हे दोघे खाली उतरत होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी क्रेन तुटली आणि रतिलाल नरोटे व अनिल नरूटे हे दोघेही बोगद्यामध्ये कोसळले गेले. हे दोघेही साधारण 250 ते 300 फूट खोल कोसळले गेले होते. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.