Baby Born With 24 Fingers : तब्बल 24 बोटांचे बाळ जन्मले; दुर्मिळ घटनेची धाराशिवात चर्चा (पाहा व्हिडिओ)

बाळ आणि आई सुखरुप असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.
mother gives birth to baby with 12 fingers and 12 toes in dharashiv
mother gives birth to baby with 12 fingers and 12 toes in dharashivSAAM TV

- बालाजी सुरवसे

Dharashiv News :

उमरगा शहरात वैद्यकीय क्षेत्रात दुर्मिळ घटना समोर आली आहे. एका मातेने चक्क २४ बोटांच्या बाळाला जन्म दिला आहे. या बाळाच्या हात व पायाच्या बोटाला प्रत्येकी ६ बोटे आहेत. बाळाची आई व बाळ सुखरुप असल्याची माहिती डॉक्टर नचिकेत इनामदार (dr nachiket inamdar omerga) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

या बाळाच्या आईचे नाव रेणुका सागर वीटकर असे आहे. त्यांनी साम टीव्हीला दिलेल्या माहितीनूसार ही त्यांची दुसरी प्रसूती आहे. बाळाचा जन्म होताच आणि त्याला सहा बाेटे असल्याची माहिती गावात कळताच अनेक जण उत्सुकतेने बाळाला पाहयला येतात. उमरगा शहरात सध्या या बाळाची चर्चा होऊ लागली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

mother gives birth to baby with 12 fingers and 12 toes in dharashiv
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी निमित्त बोंबल्या विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी; देहू, आळंदीसह शेगावात भक्तांचा लाेटला सागर

उमरगा शहरातील बालरोग व नवजात शिशु तज्ञ डॉ. नचिकेत इनामदार यांनी साम टीव्हीला दिलेल्या माहितीनूसार या बाळाच्या प्रत्येक हाताला आणि पायाला प्रत्येकी 6 बोटे आहेत. प्रत्येक हाताला आणि पायाला प्रत्येकी एक बोट अधिक दिसून येते. दरम्यान जन्मलेले बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप आहेत असेही डाॅ. इनामदार यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

mother gives birth to baby with 12 fingers and 12 toes in dharashiv
Dhuldev MIDC ला स्थानिकांचा विराेध, धुळदेव ते सातारा काढणार लाँग मार्च

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com