Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी निमित्त बोंबल्या विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी; देहू, आळंदीसह शेगावात भक्तांचा लाेटला सागर

नेहमीपेक्षा यावर्षी ठिकठिकाणच्या मंदिरात भाविकांची दुप्पट गर्दी बघायला मिळत आहे.
kartiki ekadashi celebration in various temples of maharashtra
kartiki ekadashi celebration in various temples of maharashtra saam tv
Published On

- सचिन कदम / दिलीप कांबळे / संजय जाधव / राेहिदास गाडगे

Kartiki Ekadashi News :

धाकटी पंढरी म्हणुन ओळख असणार्‍या रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील साजगावच्या विठ्ठल मंदीरात कार्तिकी एकादशी उत्साहात साजरी होत आहे. पहाटेच्या काकड आरतीने या उत्सवाला प्रारंभ झाला. (Maharashtra News)

बोंबल्या विठोबाच्या दर्शनास भाविकांची माेठी गर्दी

आज दिवसभर धार्मिक पुजाविधीसह भजन किर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने येथे भाविकांची मोठी गर्दी होते आणि या उत्सवाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. या यात्रेत पुजा साहित्य, खेळणी, पाळणे या सह सुक्या मच्छीचा मोठा व्यापार देखील होत असून हे देवस्थान बोंबल्या विठोबा (bomblya vithoba) म्हणुन देखील सर्वश्रृत आहे.

कार्तिकी निमित्त देहूत भाविकांची मांदियाळी

कार्तिकी एकादशीला ज्या भक्तांना पंढरपूरला जायला जमत नाही त्या भाविकांनी आज सकाळ पासूनच जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या देहूत मोठी गर्दी केली आहे. देहूच्या मुख्य मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे. अनेक सकल मराठा भाविकांनी मराठा आरक्षण मिळू दे असं साकडं देवाला घालायला आलाे आहाेत असे साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

kartiki ekadashi celebration in various temples of maharashtra
Nashik News : नाशिक सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलं काम बंद आंदाेलन, सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल

वारक-यांची इंद्रायणी काठावर गर्दी

आज कार्तिकी एकादशीला पंढरीत विठुमाऊलींचा कार्तिकी सोहळा पार पडल्यानंतर पंधरा दिवसांनी आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडतो. पुढच्या पंधरा दिवसांनी माऊली आळंदीत समाधीत्स झाल्याचा हा सोहळा अनुभवायला राज्यभरातुन वारकरी दिंडी माऊलींच्या अलंकापुरीत दाखल होतात. त्याच निमित्ताने आजचा कार्तिकी एकादशीचा सोहळ्याला एक वेगळं महत्व असुन वारकरी आळंदीतही साजरा करत असताना वारक-यांनी इंद्रायणी काठावर गर्दी केली आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त विदर्भाच्या पंढरीत भक्तांची मांदियाळी

आज कार्तिकी एकादशी असल्यामुळे विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव (shegaon) येथे संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी बघायला मिळत आहे. आज कार्तिकी एकादशी व गुरुवार एकत्र आल्यामुळे नेहमीपेक्षा यावर्षी दुप्पट गर्दी बघायला मिळत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी शेगाव शहरात जवळपास दीड लाख भाविक दर्शनासाठी आलेले आहेत. राज्यभरातून जवळपास दीडशे दिंड्या शेगाव शहरात दाखल झालेल्या असून शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात आज दिवसभर कार्तिकी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

kartiki ekadashi celebration in various temples of maharashtra
World Cup Cricket 2023: काॅंग्रेसच्या काळातच वर्ल्डकप जिंकू शकलाे, पराभवाबद्दल नाना पटाेले स्पष्टच बाेलले (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com