- पराग ढाेबळे
पनवती (panauti) शब्द भाजपला (bjp) इतका का झाेंबताेय असा सवाल काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले (nana patole) यांनी उपस्थित केला आहे. पनवती शब्दावरुन पंतप्रधान नरेंद्र माेदी (pm narendra modi) यांचा अपमान झाला असे काही जण म्हणत असतील तर त्यावर भाजपने आत्मपरीक्षण करावे असा सल्ला नाना पटाेलेंनी भाजपला दिला आहे. (Maharashtra News)
नाना पटाेल म्हणाले राहुल गांधी हे राजस्थानमध्ये (rajasthan) भाषण देत असताना काही तरुणांनी आवाज दिला. क्रिकेट मॅचच्या आधारावर प्रसिद्ध झालेला पनवती शब्दावर ते उल्लेख करत होते. सोशल मीडियावर प्रचलित शब्द पनवती पनवती असे मुलं तिथं ओरडत असतांना पनवतीमुळे भारतीय संघ हरला असा उल्लेख त्यांनी केला. पण यामध्ये त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे नाव न घेता देखील भाजपला पनवती हा शब्द का झाेंबताेय असा सवाल पटाेलेंनी केला.
भारतीय संघ जिकला पाहिजे असे प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी एक्स वर म्हटले हाेते. पण खेळात राजकारण केले जात आहे. याचा खेळाडूच्या मनावर परिणाम होत आहे असेही पटाेलेंनी म्हटेल. ते म्हणाले आज खेळाडूंना, देशवासियांना दुःख आहे. समाज माध्यमात आजही जनभावना पाहा. आम्ही (काॅंग्रेस) खेळाडूंबराेबर आहाेत.
आपण 10 वर्षात वर्ल्ड कप जिंकला नाही. काँग्रेसच्या काळात आपण जिंकत हाेताे. मी यात काँग्रेस भाजप करत नाही. परंतु खेळात राजकारण आलेले आहे, त्याचा परिणाम आपण विश्वकरंडक स्पर्धेत सातत्याने मागे पडत आहे हे तुम्हांला पूराव्यानिशी सांगेन असेही पटाेलेंनी म्हटले. ते म्हणाले म्हणून खेळात राजकारण आणू नका.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आमच्या काळात आम्ही हेच केले. त्याचा परिणाम खेळाडू आपल्या हिम्मतीने खेळायाचा आणि देशासाठी खेळत असताना ताे विश्वकरंडक जिंकून आणायचा असेही पटाेलांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.