Leopard Attack
Leopard AttackSaam tv

Leopard Attack: झोपलेल्या मेंढपाळ कुटुंबावर बिबट्याचा हल्ला; चिमुकलीला नेले उचलून, स्वेटरमुळे बालिका बचावली 

Dhule News : शिकार करण्याच्या उद्देशाने आलेल्या बिबट्याने मेंढीऐवजी मेंढपाळाजवळ झोपलेल्या सहा महिऱ्यांची बालिका पूनम भगवान हळनर हिला उचलून नेले
Published on

धुळे : देऊर खुर्द (ता. धुळे) शिवारात बिबट्याने मेंढपाळाच्या वाड्यावर हल्ला चढवत सहा महिन्यांच्या बालिकेस जखमी केले. (Dhule) बालिकेच्या अंगात स्वेटर असल्यामुळे बालिका बचावली आहे. या हल्ल्यात (Leopard Attack) बालिकेच्या हाताला गंभीर जखम झाली असून बालिकेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Leopard Attack
Dhangar Reservation: जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्ला प्रकरण..धनगर समाजाच्या अडीच हजार जणाविरुद्ध गुन्हे दाखल

धुळे जिल्ह्यातील देऊर खुर्द शिवारात शरद पोपट देवरे यांच्या शेतात रामपुरा (ता. बागलाण) येथील भगवान झुलाल हळनर यांचा मेंढ्यांचा वाडा मुक्कामी आहे. दरम्यान १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर तीनच्या सुमारास मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला चढविला. मेंढ्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने आलेल्या बिबट्याने मेंढीऐवजी मेंढपाळाजवळ झोपलेल्या सहा महिऱ्यांची बालिका पूनम भगवान हळनर हिला उचलून नेले. बालिकेच्या रडण्याच्या आवाजामुळे मेंढपाळ कुटुंब जागे झाले. आरोळ्या मारल्यामुळे बिबट्याने बालिकेस सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. पोलिस पाटील मनोज खोंडे यांनी धुळे वन विभागास माहिती दिली. जखमी पूनमला स्वतः मेंढपाळ कुटुंबानेच नेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Leopard Attack
Kartiki Mahapuja : विठ्ठल मंदिरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; सकाळी होणार महापूजा

स्वेटरमुळे बचावली बालिका

धुळे जिल्ह्यात यापूर्वी बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. धुळे तालुक्यातील बालिकेवर हल्ला करण्याची ही चौथी घटना आहे. मात्र अंगात स्वेटर असल्यामुळे ती बचावल्याची माहिती जखमी पूनमचे वडील भगवान झुलाल हळनर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com