Raju Shetti : पुणे- बंगळुरू महामार्ग राेखल्याप्रकरणी राजू शेट्टींसह अडीच हजार शेतक-यांवर गुन्हा दाखल

या आंदाेलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पाेलीसांनी माेठा बंदाेबस्त ठेवला हाेता.
shiroli police charged raju shetti and two thousand five hundred karykarta pune bangalore highway protest
shiroli police charged raju shetti and two thousand five hundred karykarta pune bangalore highway protestsaam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Swabhimani Shetkari Sanghatana News :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह तब्बल अडीच हजार कार्यकर्त्यांवर काेल्हापुर पाेलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेट्टी आणि त्यांच्या सहकार्यांनी गुरुवारी तब्बल 9 तास पुणे- बंगळुरू महामार्ग (raju shetti pune bangalore highway protest) राेखल्याने गुन्हा दाखल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. काेल्हापुर पाेलीस दलाच्या शिरोली पोलीस ठाण्यात शेट्टींवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलीस ठाण्यातून देण्यात आली. (Maharashtra News)

मागील वर्षी तुटलेल्या उसाला चारशे रुपये दुसरा हप्ता द्यावा. तसेच यंदा 3500 रुपये उसाला दर मिळावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी लावून धरत राजू शेट्टींनीच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून साखर कारखान्यांच्या दारात आंदाेलन सुरु हाेते. त्यानंतर हे आंदाेलन टप्प्या टप्प्याने शेट्टींनी पुढे नेले. काही ठिकाणी हे आंदाेलन चिघळलं देखील.

shiroli police charged raju shetti and two thousand five hundred karykarta pune bangalore highway protest
Mla Sangram Jagtap: आमदार संग्राम जगताप मंगळवारी बसणार उपाेषणास, प्रशासनास दिला इशारा; जाणून घ्या कारण

गुरुरवारी राजू शेट्टींनी अंबाबाईचे दर्शन घेत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह पुणे बंगळुरु महामार्ग राेखला. यामुळे या महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली. या आंदाेलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पाेलीसांनी माेठा बंदाेबस्त ठेवला हाेता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आंदाेलकांची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहकारमंत्री यांनी ताेडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर कारखानदारांनी राजू शेट्टींच्या प्रस्तावास मान्यता दिली. त्याबाबत राजू शेट्टींनी आंदाेलकांना माहिती दिली. त्यानंतर शेट्टींनी गुरुवारी रात्री आंदाेलन मागे घेतले.

तोडगा निघाला

ज्या कारखान्यांनी गेल्यावर्षीच्या उसाला प्रति टन 3000 रुपये दिले आहेत. त्या कारखान्यांनी प्रति टन 50 रुपये आणि 3000 रुपयेपेक्षा कमी रक्कम दिली आहे त्या कारखान्यांनी प्रतिटन 100 रुपये देण्याचा तोडगा निघाला आहे.

दरम्यान राजू शेट्टी आणि त्यांच्या सहकार्यांनी गुरुवारी तब्बल 9 तास पुणे- बंगळुरू महामार्ग राेखल्याने त्यांच्यावर शिरोली पोलीस ठाण्याने गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सुमारे अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com