
Uttar Pradesh Video: सोशल मीडियावर कायम हैराण करुन टाकणाऱ्या घटना पाहण्यास मिळतात. कधी विचित्र रस्ते अपघात पाहण्यास मिळतात तर कधी एखाद्या कामासाठी हटके जुगाड केलेले व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. त्यातच सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत आहे. ज्यात एका तरुणाला शर्यत लावणे अत्यंत महागात पडलेले आहे. नक्की काय घडले ते तुम्ही पाहा.
व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला दोन तरुण पंजा लढवण्याची शर्यत लढताना दिसत आहे. तरुणांच्या बाजूला अनेक व्यक्ती तसेच काही लहान मुलंही आहेत जे तरुणांमध्ये कोण जिंकत ते पाहत आहेत. काही वेळात तरुणांची पंजा लढवण्याची शर्यत(sharyat) सुरु होते. दोघेही मजबुतीने पंजा लढवत असतात मात्र काही क्षणात त्यातील एका तरुणाचा हातच तुटला जातो. हे पाहून तिथे असलेले प्रत्येकजण हैराण होतात. सर्व घटना मोबाईलमध्ये कैद झालेली आहे.
व्हायरल होत असलेली घटना उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील असल्याचे कॅप्शनधून समजते. सर्व व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेला असून तो व्हिडिओ ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत.
व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत असून बऱ्याच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''अरे, वर्षापूर्वी माझ्यासोबतही असेच घडले होते पण माझा बाईक अपघात झाला''' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''हे सर्व पाहून मन घाबरले'' शिवाय अन्य काही यूजर्संनी लिहिले आहे की,'' काय गरज होती याची'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.