Bailgada Sharyat Viral Video: गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत पाहण्याचे वेड तरुणांमध्ये वाढल्याचे दिसत आहे. तरुणच नाही तर अनेक तरुणी आणि चिमुकलीपण बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जात असतात. मात्र सोशल मीडियावर एक बैलगाडा शर्यतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी चक्क भररस्त्यात ए.स.टी. महामंडळाची बस प्रवाशांसह थांबलेली आहे. सध्या या व्हिडिओची चर्चा सर्वत्र होत आहे.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ एक विस्तृत असे मैदान दिसत आहे. या मैदानावर बैलगाडा शर्यतीचे नियोजन केलेले दिसत आहे. अनेक व्यक्ती त्यांचे बैलगाडे आणि बैल घेऊन जमलेले आहेत. मात्र या व्हिडिओत तुम्ही पाहिले तर एक बस आहे जी मैदानाच्या बाहेर असलेल्या रस्त्याच्या मधोमध थांबलेली आहे. मात्र व्हिडिओत(Video) तुम्ही नीट ऐकले तर समजेल की, बैलगाडा शर्यतीचा शेवटचा दिवस होता आणि त्यातल्या त्यात अंतिम शर्यत पार पडणार होती. जी पाहण्यासाठी अनेक नागरिकांसह ती ए.स.टी. महामंडळाची बसही थांबलेली आहे.
बैलगाडा शर्यतीचा अनोखा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@
TanviPol116027'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. एक्सवर व्हिडिओ पोस्ट करुन अवघे काही दिवस झाले आहे,मात्र काही दिवसांत व्हिडिओला हजारोच्या संख्येने लाईक्स आणि व्हिडिओला अजूनही असंख्य व्ह्यूज मिळत आहे.
बैलगाडा शर्यतीचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंती पडलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहून बऱ्याच प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''शेवटी नाद वो बाकी काय नाय'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''नाद लय भारी आहे'' तर अनेकांनी,''नाद पाहिजे नादा शिवाय काय आहे एकदम मस्त''अशा विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.