wedding stage collapse viral video
wedding stage collapse viral videosaam tv

Viral Video: वधू-वरासह लग्नाचा संपूर्ण स्टेज कोसळला; AI च्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ

wedding stage collapse viral video: लग्न समारंभात सजवलेला स्टेज कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कार्यक्रमांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Published on

लग्नसमारंभ हा आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण मानला जातो. मात्र एका लग्नात विधी सुरू होण्याच्या काही क्षणांपूर्वीच एक अशी घटना घडलीये. ज्यामुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. लग्नसाठी नवरी मुलगी स्टेजवर जात असताना स्टेज कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

छान फुलांनी सजवलेला स्टेज अचानक कोसळल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. मात्र यावेळी वधू-वरांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र या घटनेने पाहुण्यांमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. मात्र दुसरीकडे अनेकांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडीओ AI जनरेटेड असल्याचं म्हटलं जातंय.

wedding stage collapse viral video
Car Accident: हे कसं शक्य आहे? हायवेवरच्या २० फूट उंच बोर्डात अडकली थार, व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले

स्टेज कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओमध्ये लग्नाचा स्टेज छान सजावलेला पाहायला मिळतोय. यावेळी पुढच्या विधींसाठी स्टेजवर चढत असताना स्टेज कोसळतो. यावेळी स्टेजवर असलेला नवरा मुलगा देखील खाली पडतो. यामुळे उपस्थित पाहुण्यांमध्ये भीतीचं वातावरण दिसून येतं. दरम्यान काही क्षणांच्या गोंधळानंतर दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

wedding stage collapse viral video
Viral Video: टर्न घेताना महिला रायडरचा ताबा सुटला, बाईक थेट खड्ड्यात; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

या घटनेनंतर सोशल मीडियावर व्हिडीओला बरेच व्ह्यूज मिळालेत. यावेळी अनेकांनी कार्यक्रमांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केलंय. काही यूजर्सनी 'अशा कार्यक्रमांमध्ये सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देणं गरजेचं असल्याचं म्हटलंय. तर काहींनी कमेंटमध्ये हा व्हिडीओ एआयने जनरेट केल्याचं म्हटलं आहे.

wedding stage collapse viral video
Viral Video : तुला आम्ही काय कमी केलं? मुलगी गुपचूप मंदिरात लग्न करत होती, तितक्यात आई-बाप पोहचले, अन्...

जरी हा व्हिडीओ एआय जनरेटेड असला तरी मोठ्या कार्यक्रमांमध्ये स्टेज किंवा मंडप उभारणी करताना सुरक्षिततेचे नियम पाळणं महत्त्वाचं असतं. तात्पुरत्या सजावटीच्या स्ट्रक्चरमध्ये वजन सहन करण्याची क्षमता, योग्य साहित्याचा वापर याकडे दुर्लक्ष झाल्यास अशा घटना घडू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com