

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच सध्या एका बाईकस्वार मुलीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये एका अरुंद आणि वळणाच्या डोंगराळ रस्त्यावर बाईक चालवताना एका महिलेचा तोल जाऊन ती थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळताचा हा व्हिडीओ आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास घडला. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला नॉर्मल स्पीडने डोंगराळ रस्त्यावर बाईक चालवताना दिसतेय. यावेळी तिचा कंट्रोल सुटतो आणि तोल जातो. ती महिला बाईक सावरायचा प्रयत्न करत असली तरी काही सेकंदांतच ती रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडते.
दरम्यान हा संपूर्ण प्रकार मागून येत असलेल्या गाडीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून काहींनी या महिलेबाबत काळजीही व्यक्त केलीये. तिला गंभीर दुखापत झाली असावी, असा अंदाजही काहींनी व्यक्त केला.
मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिलेने स्वतः प्रतिक्रिया दिलीये. या चर्चांना पूर्णविराम देत संबंधित महिलेने सोशल मीडियावर पोस्ट करून आपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलंय. तिच्या म्हणण्यानुसार, अपघातात तिला किरकोळ खरचटण्याशिवाय कोणतीही दुखापत झालेली नाही.
या घटनेवर नेटिझन्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येताना दिसतायत. अनेकांनी डोंगराळ आणि वळणं असलेल्या रस्त्यांवर गाडी चालवताना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलाय. एका यूजरने म्हटलंय की, अशा रस्त्यांवर अनुभव आणि सतर्क राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलंय की, अशावेळी छोटीशी चूक जीवघेणी ठरू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.