Viral Video: ४ वर्षांचा चिमुकला अंगणवाडीतच अडकला; आई-बाप रात्रभर शोधत बसले, सकाळी कुलुप उघडलं...!

Nagpur child trapped overnight school room: नागपूरच्या खापरखेड्यात बेपत्ता झालेला चार वर्षांचा मुलगा रात्रभर शाळेच्या खोलीत अडकलेला आढळला. पोलिसांच्या शोधमोहीमेनंतर सकाळी तो सुरक्षित सापडल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.
Nagpur child trapped overnight school room
Nagpur child trapped overnight school roomsaam tv
Published On

नागपूरच्या खापरखेड्यातून एक धक्कादायक पण दिलासादायक घटना समोर आलीये. खेळता खेळता शाळेच्या खोलीत गेलेला चार वर्षांचा चिमुकला रात्रभर तिथेच कोंडला असल्याचं समोर आलं आहे. संध्याकाळपासून बेपत्ता झाल्याने या मुलाच्या कुटुंबीयांनी अपहरणाची भीती व्यक्त केली होती.

यावेळी पोलिसांनी सात पथकं तैनात करत रात्रभर शोधमोहीम राबवली. अखेर सकाळी शाळेची खोली उघडताच चिमुकला सुखरूप असल्याचं समजलं. यावेळी सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

नेमकी घटना काय घडली?

बोरकर लेआउट परिसरातील चार वर्षीय हिमांशू बागडे हा दुपारी खेळता खेळता जवळील बालवाडीत गेला. मागील खोलीत गेल्यानंतर तो इतका थकला होता की तिथेच झोपून गेला. संध्याकाळी शाळेतील कर्मचाऱ्याने समोरची खोली तपासली आणि शाळेला कुलूप लावलं. त्यामुळे हिमांशू रात्रभर आतच कोंडला गेला.

Nagpur child trapped overnight school room
Viral Video: 10 सेकंदात धावत्या बसला आग; जीवाची बाजी लावत डिलीव्हरी बॉयने वाचवले प्रवाशांचे प्राण, थरारक व्हिडीओ व्हायरल

संध्याकाळचे पाच-साडेपाचपर्यंत मुलगा घरी न परतल्याने आईने नातेवाईकांना कळवलं. यानंतर हिमांशूचा शोध घेण्यास सुरुवात झाली. मात्र काहीच सुगावा लागला नाही. यावेळी वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. अपहरणाचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी सात पथकं तयार केली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तलाव, नाले, झाडी-झुडुपं, शेजारील परिसरात रात्रभर शोधमोहीम सुरू होती.

मुलगा सापडत नसल्याने आईने हंबरडा फोडला. चिमुकल्याचे वडील अस्वस्थ झाले होते. यावेळी परिसरात घातपाताची चर्चा सुरू झाली.

Nagpur child trapped overnight school room
Viral Video:भाच्याच्या लग्नात मामाचा मृत्यू, बेफाम डान्स करताना अचानक कोसळले अन्...!

दरम्यान, सकाळी पोलीस उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांनी शाळेची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला. खोलीचं कुलूप उघडताच आत हिमांशू सुखरूप आढळला. रात्रभर बंद खोलीत राहूनही तो सुरक्षित होता.

Nagpur child trapped overnight school room
Viral Video: शूज लपवण्यात मेव्हणीचा मास्टरस्ट्रोक; नवऱ्याचे शूज अशा ठिकाणी लपवले की शोधूनही सापडणार नाहीत!

या घटनेनंतर शाळा आणि बालवाडी प्रशासनाने कुलूप लावण्यापूर्वी प्रत्येक खोलीची काटेकोर तपासणी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ समोर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com