Viral Video:भाच्याच्या लग्नात मामाचा मृत्यू, बेफाम डान्स करताना अचानक कोसळले अन्...!

Man dies while dancing at wedding mehendi ceremony: मध्य प्रदेशातील एका लग्नसोहळ्यात मेहंदी कार्यक्रमादरम्यान नाचत असताना व्यक्तीचा अचानक हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीये. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Man dies while dancing at wedding mehendi ceremony
Man dies while dancing at wedding mehendi ceremonySAAM TV
Published On

लग्न समारंभ म्हटला की, सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. मात्र आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही मनाला चटका लागेल. या व्हिडीओमध्ये लग्नासंमारंभात नाचताचा एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय.

मध्य प्रदेशच्या ओझरामध्ये झालेल्या लग्नसोहळ्यात ही दुर्दैवी घटना घडलीये. मुख्य म्हणजे या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. लग्नापूर्वी असलेल्या मेहंदी कार्यक्रमादरम्यान नाचत असताना एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने आनंदाच्या वातावरणाला गालबोट लागलंय.

Man dies while dancing at wedding mehendi ceremony
Viral Video: 10 सेकंदात धावत्या बसला आग; जीवाची बाजी लावत डिलीव्हरी बॉयने वाचवले प्रवाशांचे प्राण, थरारक व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर झाला व्हिडीओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं नाव घनश्याम यादव असं होतं. ही व्यक्ती त्याच्या भाच्याच्या लग्नासाठी कुटुंबासह ओझरामध्ये आली होती. मंगळवारी रात्री मेहंदीच्या कार्यक्रमात कुटुंब आणि पाहुणे डान्स करत होते. याच दरम्यान घनश्याम यादव त्यांच्या पत्नीसोबत नाचत असताना ते अचानक खाली कोसळले.

मेहंदी समारंभाला उपस्थित असलेल्यांनी सांगितलं की, सुरुवातीला सर्वांना हा एक डान्सचा भाग असल्याचं वाटलं. मात्र काही वेळानंतर ते हालचाल करत नसल्याचं लक्षात येताच गोंधळ उडाला. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.

Man dies while dancing at wedding mehendi ceremony
Delivery boy: कल्याणमध्ये डिलिव्हरी बॉयचा प्रताप, कारवाई टाळण्यासाठी नंबर प्लेटवर लावले स्टिकर्स

आनंदाचं वातावरण झालं शोकाकुल

घटनेनंतर लग्नसोहळ्यातील आनंदाचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. कुटुंबीय आणि उपस्थित पाहुण्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यावेळी अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत

Man dies while dancing at wedding mehendi ceremony
Viral Video: 10 सेकंदात धावत्या बसला आग; जीवाची बाजी लावत डिलीव्हरी बॉयने वाचवले प्रवाशांचे प्राण, थरारक व्हिडीओ व्हायरल

युझर्सने केल्या कमेंट्स

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत ही घटना दुःखद असल्याचं म्हटलंय. एका युजरने यावर कमेंट्स करत म्हटलंय की, जास्त आवाजाचा परिणाम तुमच्या हृदयावर पडतो. अशावेळी हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो. तर अजून एका युजरने म्हटलंय की, ही घटना कोरोना वॅक्सिन घेतल्यामुळे झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com