Viral Video : तुला आम्ही काय कमी केलं? मुलगी गुपचूप मंदिरात लग्न करत होती, तितक्यात आई-बाप पोहचले, अन्...

Viral video of couple secretly marrying in temple : मंदिरात गुपचूप लग्न करत असताना मुलीचे पालक अचानक पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवर नेटिझन्समध्ये प्रेम आणि कुटुंब याबाबत चर्चा रंगलीये.
Viral video of couple secretly marrying in temple
Viral video of couple secretly marrying in templeSAAM TV
Published On

आजकाल अनेक घटना या सोशल मीडियामुळेच आपल्याला समजतात. सोशल मीडियामुळे अनेक व्हिडीओ आपल्यापर्यंत पोहोचतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये एक तरूण जोडपं गुपचूप लग्न उरकत असतात आणि त्याचवेळी त्यांचे पालक त्याठिकाणी येतात. यावेळी मुलीचे पालक या लग्नाच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळतंय.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मंदिरात एक तरूण मुलगी आणि तिचा प्रियकर गुपचुप लग्न उरकण्यासाठी आलेले असतात. या वेळी अचानक मुलीचे आई-वडील तिथे पोहोचतात. मुलगी गुपचूप लग्न करत असल्याचं पाहून त्यांना धक्का बसतो. आई-वडिलांना पाहून मुलगी घाबरते आणि प्रियकराचा हात धरते.

Viral video of couple secretly marrying in temple
Bike Stunt Viral Video: पप्पांची परी रस्त्यावर सुसाट सूटली; दुचाकीवारील अपघाताचा थरारक VIDEO व्हायरल

मुलगी तिच्या वडिलांना विनंती करत असते की, बाबा तुम्ही माझं का ऐकत नाहीत. हा मुलगा माझ्यासाठी योग्य आहे. तिचे वडील तिला म्हणतात की, तू लहान असल्यापासून तुझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत. तर मग तु ही इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून कशी लपवून ठेवलीस?

Viral video of couple secretly marrying in temple
Girl Bike Stunt Viral: हवेच्या वेगात आली धपकन पडली, दुचाकी चालविणाऱ्या तरूणीचा VIDEO व्हायरल

हा सर्व प्रकार घडत असताना बाजूला मुलाचे पालक देखील उभे असतात. मुलीच्या वडिलांचं म्हणणं ऐकून ते म्हणतात, की झालं गेलं आता राहूदे...आपण मुलांना आशिर्वाद देऊया. मात्र तरीही मुलीचे वडील या लग्नाला विरोधच करतात. यानंतर मुलीची आई मुलीला घेऊन निघून जाते.

Viral video of couple secretly marrying in temple
Viral Video: टर्न घेताना महिला रायडरचा ताबा सुटला, बाईक थेट खड्ड्यात; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

हा व्हिडिओ एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर होताच काही तासांतच हजारो व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्या. अनेक युजर्सने या कपलच्या प्रेमाला पाठिंबा दिलाय. काहींनी म्हटलंय की, 'यांच्या प्रेमाला समजून घ्यायला हवं'. तर काहींनी पालकांच्या भूमिकेला समर्थन देत मुलीच्या आई वडिलांचं म्हणणं योग्य असल्याचं म्हटलंय.

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com